डेरा आंदोलन सुरुच!

0
568

डेरा आंदोलन सुरुच!

आंदाेलनाचा ३७ वा दिवस, अद्याप ताेडगा नाही

कामगारांची परिस्थिती बिकट ; शासनाने तातडीने लक्ष पुरवावे

चंद्रपूर 🟣किरण घाटे । सात महिण्यांचा पगार तथा किमान वेतन लागू करा या प्रमुख दाेन मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालया समाेर तब्बल ५००कंत्राटी कामगार गेल्या ८फेब्रुवारी पासून डेरा आंदाेलनात सहभागी झाले असुन या आंदाेलनाचे नेत्रूत्व मनपाचे विद्यमान नगर सेवक तथा जनविकास कामगार संघाचे सर्वेसर्वा पप्पु देशमुख करीत आहे. 🟢🔵🔴🟡🔴🟡🟢🟣🟠🔶त्यांनी डेरा आंदाेलनात स्वयंस्फुर्तिने सहभागी झालेल्या कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसंदर्भात वारंवार जिल्हा प्रशासनासह शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे .परंतु त्यांचे अथक प्रयत्नाला अद्याप यश प्राप्त झाले नाही .आज आदाेलनांचा ३७वा दिवस असल्याचे डेरा आंदाेलनातील कामगारांनी या प्रतिनिधीस एका भेटीत सांगितले .🟡🟢🟠🔴🟣🔵🟤🔴🟣🔶काेराेना सारख्या महासंकटात या कामगारांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता दिवस रात्र निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडले .त्यांचा काेराेना याेध्दा म्हणुन प्रशासनाने सन्मान देखिल केला परंतु आज याच कंत्राटी कामगारांना रस्त्यावर येवून आंदोलन करावे लागत आहे .हे त्यांचे एक दुर्भाग्यच आहे .असेच म्हणावे लागेल .🔴🟠🟢🟡🔵🟤🔴🟣🟠🔶दरम्यान त्यांचे या आंदाेलनाला शहरातील अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांनी व सदस्यांनी भेटी देवुन आपला पाठिंबा दिला आहे .एव्हढेच नाही तर कंत्राटी कामगारांच्या मागण्यां रास्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे .शासनाने या कडे तातडीने लक्ष पुरवून त्यांना याेग्य न्याय द्यावा अशी सर्वस्तरांवरुन अपेक्षा व्यक्त हाेत आहे . तरं जाे पर्यंत मागण्या पदरात पडत नाही ताे पर्यंत हे आंदोलन असेच सुरु ठेवण्यांचा कामगारांचा निर्धार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here