समाज माध्‍यमांचे महत्‍व ओळखत जनतेशी भाजपाचे नाते दृढ करणारा लोकोत्‍तर नेता

0
400

 

पक्षाची ध्‍येय धोरणे, संघटनात्‍मक कामकाजाची माहीती तसेच लोकप्रतिनिधींच्‍या माध्‍यमातून करण्‍यात येणारी विकास कामे यांची माहीती सर्वसामान्‍य जनतेपर्यंत, पत्रकार बांधवांपर्यंत सहज पोहचण्‍यासाठी  सोशल मिडीया हे अत्‍यंत प्रभावी माध्‍यम ठरले आहे. या माध्‍यमाची गरज लक्षात घेता लोकनेते मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्‍हयात भाजपाची सोशल मिडीया विंग सशक्‍त व्‍हावी याकडे विशेष लक्ष दिले. मी आज चंद्रपूर जिल्‍हा भाजपाच्‍या सोशल मिडीया सेलचा प्रमुख आहे, चंद्रपूर जिल्‍हयातील भाजपाचे सोशल मिडीया सेक्‍टरमधील प्रभावी काम म्‍हणजे सुधीरभाऊंची प्रेरणा व प्रोत्‍साहन आहे असेच मी म्‍हणेन.

तसा या क्षेत्रात मी योगायोगानेच आलो. हा योगायोग तसा दुःखदच आहे. यापुर्वी सोशल मिडीयाची जवाबदारी माझा धाकटा भाऊ कै.अमोल कोंडबत्तुनवार याच्‍याकडे होती. अमोलचे अपघाती निधन झाले. आमच्‍या कुटूंबावर मोठा आघात झाला. घरातील मोठा म्‍हणून संपूर्ण कुटूंबाची जवाबदारी माझ्यावर आली. जीव की प्राण असलेला छोटा भाऊ गमावल्‍याचे दुःख सुध्‍दा मोठे होते. याकाळात सुधीरभाऊंनी आमच्‍या कुटूंबियांना दिलेला भावनीक आधार फार मोठा आहे. तो आम्‍ही कधीही विसरु शकणार नाही. किंबहूना त्‍यांच्‍या आभाळमायेच्‍या भरवशावरच या दुःखातून आमचे कुटूंब सावरु शकले.
अशातच एक दिवस सुधीरभाऊंचा फोन आला व अमोलच्‍या पश्‍चात सोशल मिडीयाचे प्रमुख पद मी स्विकारावे अशी सुचना त्‍यांनी केली. मी नकार देवु शकलो नाही. तसे केले असते तर साक्षात भगवंतालाच नकार देण्‍यासारखे ठरले असते. मी त्‍यांची सुचना मान्‍य केली व आज सोशल मिडीया सेलचा प्रमुख म्‍हणून मी कार्यरत आहे. सुधीरभाऊंच्‍या कार्यालयातून प्रसिध्‍द होणारी प्रत्‍येक बातमी, भाजपाच्‍या संघटनात्‍मक कामाविषयीच्‍या बातम्‍या, दिनविशेषानिमित्‍त शुभेच्‍छांच्‍या पोस्‍ट, व्हिडिओ, त्‍यांचे दैनंदिन कार्यक्रम, विविध विकास कामांच्‍या निमितताने प्रसिध्‍द होणा-या माहीतीवजा पोस्‍ट आदिंचे प्रसारण तात्‍काळ जिल्‍हाभर, महाराष्‍ट्रभर करणे यावर आमचा भर असतो. त्‍यात व्‍हॉट्सअॅप, फेसबुक,ट्विटर आदी माध्‍यमातून ही माहीती जनतेपर्यंत एका क्लिकवर पोहचविण्‍याची जवाबदारी माझ्यावर व माझ्या सर्व सहका-यांवर असते.

कोणतीही लोकहिताची कामे तात्‍काळ करणे, शासनाला निर्णय घेण्‍यास भाग पाडणे व त्‍यासाठी प्रभावी पाठपुरावा करणे यात सुधीरभाऊंचा हातखंडा आहे. एखादा निर्णय त्‍यांच्‍या पुढाकाराने झाला की तो जनतेपर्यंत तात्‍काळ पोहचावा, संबंधितांना त्‍याची माहीती मिळावी यासाठी भाऊ नेहमी आग्रही असतात. त्‍या आग्रहामुळेच ती तत्‍परता सोशल मिडीयाच्‍या आमच्‍या सर्वांमध्‍ये आली आहे. तो सुधीरभाऊंचाच संस्‍कार आहे असे मी म्‍हणेन.

सुधीरभाऊ चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री, राज्‍याचे अर्थ व वनमंत्री असताना ही जवाबदारी फार मोठी होती. सतत निर्णय होत असायचे, त्‍यामुळे सोशल मिडीया सक्रिय असावा असा भाऊंचा दंडक होता, आग्रह होता. प्रामुख्‍याने वृक्ष लागवड मोहीम, आर्थिक प्रगतीबाबत व चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासाबाबतचे सुधीरभाऊंचे निर्णय जनतेपर्यंत जलदगतीने पोहचावे असा प्रयत्‍न आम्‍ही नेहमीच केला. आज राज्‍यात सत्‍तांतर झाले असेल तरीही सुधीरभाऊंच्‍या कामकाजाची पध्‍दत शासनासारखीच आहे. शासनाला निर्णय घेण्‍यास भाग पाडण्‍याची त्‍यांची हातोटी, त्‍यांचा प्रभावी पत्रव्‍यवहार व पाठपुरावा, विधानसभेत विविध संसदीय आयुधांच्‍या माध्‍यमातून जनतेच्‍या प्रश्‍नांसाठी बुलंद होणारा आवाज सोशल मिडीयाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही सर्व त्‍याच गतीने जनतेपर्यंत पोहचविण्‍याचा प्रामाणिक प्रयत्‍न करीत असतो.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत गेला, लॉकडाऊन घोषित झाले. सुधीरभाऊंचे मदत कार्य सुरु झाले. विविध विषयांवर ऑनलाईन बैठकी सुरु झाल्‍या, वेबीनार सुरु झाले. यातही सुधीरभाऊ कायम आघाडीवर. त्‍यामुळे सोशल मिडीयाची जवाबदारी अर्थातच वाढली. भाऊंच्‍या पाठींब्‍यामुळे, प्रोत्‍साहनामुळे व प्रेमपुर्वक अॅप्रोचमुळे आम्‍ही सर्वांनी ही जवाबदारी यशस्‍वीपणे पार पाडली. न थकता अविरत काम करणारा हा लोकनेता आमचा नेता आहे. याचा अभिमान आम्‍हा सर्वांना आहे. सुधीरभाऊंनी मध्‍यरात्री जरी आवाज दिला तरी आम्‍ही सारे सोशल मिडीयाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला तयार असतो. समाज माध्‍यमांचे महत्‍व ओळखत जनतेशी भाजपाचे नाते दृढ करणारा लोकोत्‍तर नेत्‍याला त्‍यांच्‍या जन्‍मदिनानिमित्‍त मनःपूर्वक शूभेच्‍छा ! त्‍यांच्‍या हातून सदैव अशीच लोकसेवा घडावी व त्‍यांना निरामय दीर्घायुष्‍य लाभावे हीच परमेश्‍वरा चरणी प्रार्थना.

*राकेश कोंडबत्‍तुनवार*
भाजपा सोशल मिडीया
जिल्‍हा संयोजक, चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here