खडसंगी येथे उघड्या रोहित्रामुळे जीव धोक्यात

0
369

खडसंगी येथे उघड्या रोहित्रामुळे जीव धोक्यात

अपघाताची शक्यता;त्वरित कुलूप लावण्याची मागणी

तालुका प्रतिनिधी
चिमूर

तालुक्यातील खडसंगी गावातील स्ट्रीट लाइटला वीजपुरवठा करण्याऱ्या रोहित्र उघडे अवस्थेत आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या रोहित्रामुळे अपघात होण्याची शक्यता असून या कडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालून या रोहित्राला कुलूपबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

खडसंगी गावातील ग्रामपंचायत कार्यालयामार्फत गावातील अंतर्गत पथदिव्याना वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्र गावातील वर्दळीच्या चौकात आहे. या चौकात नेहमी नागरिकांची ये-जा सूरु असते तर रोहित्र लागलेल्या खांबा जवळ बालके खेळत असतात.
चौकात असलेल्या या खांबाच्या रोहित्र उघड्या अवस्थेत असते. या बाबी कडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असून , या उघड्या रोहित्राला कुणाचाही नकळत स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. या मुळे हे रोहित्र कुलूपबंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here