गोंडपीपरीचे तहसीलदार के.डी. मेश्राम यांनी घेतली कोरोना लस
पात्र नागरिकांनी कोरोना लस टोचून घेण्याचे केले आव्हाहन

गोंडपिपरी(सूरज माडूरवार)
शासनाने कोरोणाचा वाढता प्रभाव बघता नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने कोरोना लसीचा शुभारंभ केला. अश्यातच सामान्य ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी कोरोना लसीकरनाची सुरवात मागील आठवळ्यात झाली. दि.१३ शनिवारी
गोंडपीपरी तालुक्याचे तहसीलदार के .डी.मेश्राम यांनी ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली.
गोंडपीपरी तालुक्यात कोरोना लसीकरण सुरू झाले आहे.कोरोना सारख्या आजाराचे समूळ नष्ट करण्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी कोरोनाची भीती न बाळगता मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोरोना लस टोचून घेण्याचे आवाहन सुद्धा गोंडपीपरी तालुका वासीयाना केले आहे.