मार्गदर्शक विचारांच्या पर्वाचा अंत – आ. किशोर जोरगेवार

0
226

मार्गदर्शक विचारांच्या पर्वाचा अंत – आ. किशोर जोरगेवार

समाजसेवक तथा माजी आ. एड. एकनाथ साळवे यांनी कठीण काळात योग्य मार्गदर्शन करुन अनेकांना राजकीय व सामाजीक जिवणात मार्ग दाखवण्याचे काम केले. राजकारणातील कठीण काळात मलाही त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या जाण्याने एक मार्गदर्शक हरपला असून मार्गदर्शक विचारांच्या पर्वाचा अंत झाला असल्याची शोकसंवेदना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.
माजी आ. एड. एकनाथ साळवे यांनी नेहमी समाज प्रबोधनाचे काम केले. राजकारणातील समाजसेवक अशी त्यांची ओळख होती. 11 वर्ष त्यांनी चंद्रपूर विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्याकडे विचारांचा मोठा ठेवा होता. चंद्रपूरच्या विकासाबाबतची त्यांची तळमळ त्यांच्या बोलण्यातून नेहमी जाणवायची. एनकाउंटर या कादंबरीतून त्यांनी आपले विचार व उपेक्षीतांचे वास्तव दर्शवीले. आज त्यांच्या जाण्याने एका विचारांच्या पर्वाचाही अंत झाला असून, कधीही भरुन न निघणारे सामाजीक व राजकीय नूकसान झाले असल्याचे या शोक संदेशात आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here