दोन महिन्यांच्या लग्नापूर्वीच शेतकरी युवकाची आत्महत्या

0
538

दोन महिन्यांच्या लग्नापूर्वीच शेतकरी युवकाची आत्महत्या

स्वतःच्या शेतात लावली घेतला गळफास

आत्महत्यांचे कारण गुलदस्त्यात

तालुका प्रतिनिधी
चिमूर

तालुक्यातील सोनेगाव (वन) येथील तरुण शेतकऱ्याने स्वताच्याच शेतात गळफास घेऊन मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आत्महत्या केली आहे.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.

तालुक्यातील सोनेगाव वन येथील युवा शेतकरी गजानन फागोजी भोयर(वय २६वर्ष ) यांचे दोन महिन्यांनी लग्न होते आकस्मिकरित्या युवा शेतकऱ्याचा मृतयदेह त्याच्या शेतात आढळून आल्याने एकच खळबळ होती.या मागचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.मृतक गजानन भोयर यांचे कुटुंबात आई, वडील, भाऊ बहीण, असा परिवार असून, लहान बहिणीचे लग्न झाले. त्यामुळं घरी दोघेच भाऊ, मोठ्या भावाचे सुद्धा लग्न झाले आहे. त्यामुळं सर्व कुटूंब हे संयुक्तरित्या राहत होते. गजानन चे नुकतेच नवरगाव येथे लग्न जुळले असून, तो आपल्या सुखी संसाराची स्वप्ने पाहात होता. गजाननचे लग्न मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होते. असे गावकऱ्याकडुन माहिती मिळाली. गजानन चे लग्न दोन महिन्यावर येऊन ठेपले असून, दोन महिन्यांच्या लग्नापूर्वीच गजानन ने शेतात फाशी घेऊन स्वतःचीच प्राणज्योत विझवली.
गावकऱ्याच्या चर्चेनुसार गजानन च्या घरी कधी कधी कुटूंबियासोबत खटके उडत असत. गजानन घरचीच शेती करायचा तो शेतीची जागल सुद्धा करीत होता. आत्महत्या करण्यापूर्वी गजानन हा स्वतःची सासुरवाडी नावरगाव येथे काल जाऊन आला होता. सासुरवाडी येथून जाऊन आल्यानंतर तो सायंकाळच्या सुमारास शेतात गेला असल्याने. गजानन च्या मोठ्या भावाने गजानन कुठं गेला म्हणूंन सायंकाळी 5 वाजता दरम्यान स्वाताच्या शेतात जाऊन पहिले तर गजानन शेतात झोपला असल्याचे दिसून आले. नंतर रात्रौ 8 वाजता दरम्यान अजून जाऊन पहिले तर गजानन शेतात दिसूनच आला नाही. त्यामुळं त्याची शोधाशोध सुरु झाली असल्याने सकाळी गावातील काही नागरिक फिरायला गेले असल्याने गजानन च्या घरच्या कुटुंबियांना घटना सांगण्यात आली. तेव्हा गजानन च्या कुटूंबियांना शेताकडे धाव घेतली. असल्याने गजानन ने शेतातच फाशी घेतल्याचे दिसून आल्याने याबाबद्द गावात माहिती देण्यात आली. गावचे पोलीस पाटील यांनी चिमूर पोलिसांना माहिती दिली. चिमूर पोलीस याचा अधिक तपास करीत असून, वृत्त लिहत पर्यँत गजानन ला चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास आणण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here