भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा पुनर्स्थितीत स्थापित करा!

0
218

भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा पुनर्स्थितीत स्थापित करा!

अमोल राऊत/राजुरा

चंद्रपूर: शहराततील बीएसएनएल कार्यालया जवळ बिरसा मुंडा चौक असे महानगर प्रशासनाने नाव देऊन 21 तारखेला बिरसा मुंडा यांचे स्मारक बसविण्यात आले. मात्र महानगर प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता पाच दिवसांनी सदर स्मारक व बिरसा मुंडा यांचा पूर्णाकृती पुतळा हटविला. यामुळे आदीवासी बांधवांचा अनादर करण्यात आला असून भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याची विटंबनाच या कृत्याने महानगर प्रशासनाने केली आहे. याविरोधात आज सर्वपक्षीय बेमुदत बैठा सत्याग्रह महानगर पालिका चंद्रपूर येथे करण्यात आला आहे.
भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य आदिवासींना प्रेरणादायी आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळावी या उदात्त हेतूने या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. मात्र महानगर प्रशासनाने भगवान बिरसा मुंडा यांचा अनादर करून एकप्रकारे विटंबनाच करत आदिवासी बांधवांच्या अस्मितेला ठेच पोहचविण्याचे काम केले आहे. चंद्रपूर जिल्ह्याला देशात व जगात आदिवासी क्रांतीचा जिल्हा म्हणून ओळख आहे. स्वातंत्र्य काळात ब्रिटिशांसोबत लढण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. फार मोठा उलगुलांन उभा केला. पूर्वसूचना न देता स्मारक हटविल्याने संपूर्ण देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून याचे देशभर पडसाद उमटत आहे. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे समाजविघातक माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य महानगर प्रशासनाने केले असून सर्व स्तरातून या घटनेचा निषेध नोंदविण्यात येत आहे. या बेमुदत बैठा सत्याग्रहातून महानगर प्रशासनाने हटविलेले स्मारक सन्मानाने पुनर्स्थितीत स्थापन करावे, भगवान बिरसा मुंडा चौकाचे सौंदर्यकरण करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी सर्व पक्षीय संघटनातील आदिवासी बांधव उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here