खातेदाराच्या ठेवीवर शाखा व्यवस्थापकाचा डल्ला

0
1781

खातेदाराच्या ठेवीवर शाखा व्यवस्थापकाचा डल्ला

बँक ऑफ इंडीया भं.तळोधी शाखेतील प्रकार

दोषींवर कार्यवाहीची मारोती अम्मावार यांची मागणी

गोंडपिपरी (सूरज माडूरवार)

तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील बँक व्यवस्थापकाने खातेदाराच्या चक्क ठेवीवरच डल्ला मारला असून या प्रकाराची चौकशी करून दोशीवर कारवाई करण्याची मागणी माजी उपसरपंच मारोती अम्मावार यांनी
पत्रकार परिषदेतून केला आहे.

भंगाराम तळोधी येथील मेंढपाळ मल्ला पोच्या बोरलावार यांनी आपल्या मेंढ्या विक्री करून दि.१२/०४/२०१९ ला 2 लाख 90 हजार,दि.१०/१०/२०१९ ला 3 लाख रु.दि.०९/०४/२०२० ला 2 लाख 50 हजार रु शाखा तळोधीत जमा केले .व कौटुंबिक काम असल्यामुळे दि.५/०३/२०२१ ला रक्कम काढण्याकरिता गेले असता खात्यामध्ये लाखो रुपयांची तफावत आढळून आली.पैसे भरताना येताच वेळी लाखांची रक्कम टाकली तशा पावत्या देखील आहेत.मात्र पाचबुकावर 5 हजारांच्या शेकडो नोंदी आहेत.त्यात तफावत असून ८/१०/२०१९ ला १ लाख ५० हजार रु काढल्याची नोंद आहे जेव्हा की मी ती काढली नसून 3 लाख 50 रु कमी असून ती रक्कम मिळवून देऊन बँक व्यवस्थापकावर कारवाई करावी अशी मागणी माजी उपसरपंच मारोती अम्मावार ,ठेवीदार मल्ला पोच्या बोरलावार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
—————————————–
मल्ला पोच्या बोरलावार यांनी मेंढया विकून मोठ्या रकमा ब्यांकेत टाकल्या आहे.तशे पुरावे देखील आहे.परंतु बँक व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी मिळून पैसे वापरून 5 हजार ,5 हजार रु टाकले आहे.त्यात साडे 3 लाख रुपयाची तफावत असून दोषींवर कारवाई करावी-

मारोती अम्मावार- माजी उपसरपंच भंगाराम तळोधी
——————————————-

टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे रक्कम जमा करण्याकरिता विलंब झाला.ही बाब लक्षात येताच लगेच आमच्या प्रतिनिधीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.दुसऱ्या दिवशी खातेदाराच्या खात्यावर गाहाळ झालेली रक्कम जमा केली.

मिथुन बरसागडे बँक व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा भं तळोधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here