पोलीस बॅरीकेटचा वापर नेत्यांच्या वाढदिवस फलकासाठि

0
580

 

पोंभुर्णा:- सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर जिकडे तिकडे हाहाकार माजला आहे अशातच शासनाने लाकडाऊन करत गावागावात येणाऱ्या जानार्याची कसुन चौकशी केली जात आहे.यासाठि पोलीस २४तास कर्तव्यासाठि उभे आहेत मोक्याच्या ठिकाणी बॅरीकेट लावण्यात आले आहेत.लोकांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या संदर्भात पोलीसांकडून जागृती केली जात आहे तसेच न मानणार्या लोकांना दंड स्वरुपात शिक्षा हि केली जात आहे.
पोंभुर्ण्यात मात्र पोंलीसांचे प्रामाणिक प्रयत्न व लोकांना मज्जाव करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरीकेट्स ला गाव पुढार्याकडुन हळताल फासल्या जात आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा ३०जुलै ला वाढदिवस आहे त्या निमित्ताने पोंभुर्णा शहरात ठिकठिकाणी गावपुढार्याकडुन शुभेच्छा चे फलक लावण्यात आले आहेत.सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आपल प्रेम किती जास्त आहे हे दाखवण्याची होळ लागल्यामुळे शुभेच्छा फलक नेमके कोणत्या ठिकाणी लावायचे याची सुध्दा जाण गावपुढार्यांना राहिली नसल्याचे चित्र दिसुन येत आहे.
शहरातील बस स्थानक चौकात पोलिस प्रशासनाकडून लोकांची गर्दी टाळण्यासाठी रस्त्यावर बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत.त्या बॅरीकेट्स वर चक्क वाढदिवसाच्या शुभेच्छा चे फलक लावण्यात आले आहेत.कोरोनाच्या या भयंकर आपत्ती मध्ये कोरोनाच रोखथाम करण्यासाठी शासन व प्रशासन कडुन योग्य ते शर्तीचे प्रयत्न केल्या जात आहेत.कोरोणामुळे अख्ख जग शांत असताना पोंभुर्णा शहरात मात्र पुढार्यांकडुन जल्लोष करताना पाहायला मिळत आहे.
बॅरीकेट्स नेत्यांच्या वाढदिवस साठी आहेत की कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लावण्यात आले आहेत ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here