श्री रासबिहारी कॉटन इंडस्ट्रीजला आग

0
1113

श्री रासबिहारी कॉटन इंडस्ट्रीजला आग

करोडोचे नुकसान:आग नियंत्रित आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न

गोंडपीपरी-सुरज माडुरवार

:गोंडपिपरी-बल्लारपूर महामार्गावरील धानापूर गावालगत असलेल्या कॉटन इंडस्ट्रीजला आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. ही आग अचानक लागल्याने तिथं उपस्थित असलेल्या मजुरांची तारांबळ उडाली.

कॉटन इंडस्ट्रीजला आग कशी लागली हे अद्याप कळू शकले नाही. प्राथमिक माहितीनुसार आगीत करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. सदर कॉटन इंडस्ट्रीज ही प्रेमलता गोनपल्लीवार आणि आनंदीदेवी सारडा यांच्या मालकीचे आहे.
आग विजवण्यासाठी राजुरा,चंद्रपूर येथील अग्निशामक दलाला आमंत्रित केले असून आग विजवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here