माझ्या पतीला अटक करण्यास पोलीस असमर्थ  जबाबदारी माझेवर दया. पिडीत महिलेचे आवाहन.

0
339

 

चंद्रपूर:-

बल्लारपूर येथील साईबाबा वांडत राहणाऱ्या रूची कुडवे या मुलीचा ब्राम्हण समाजातील सुरज चौबे या मुलीशी प्रेम विवाह सन २०१५ ला झाला व त्यानंतर नोंदणीकृत विवाह २०१८ ला झाला. पण मुलगी ही दैलीत समाजाची असल्याने सुरज चौके या ब्राह्मण परिवाराने मुलीला घरात घेण्यास मनाई केली व ती मुलगी दलीत समाजाची व निच आहे तिला घरात घेशील तर तुला सुध्दा घरातुन हाकलुन देईल अशा प्रकारच्या धमक्या पती सुरज चौबेला मिळायचा. त्यामुळे तो मुलीच्या माहेरी येवूनच राहायचा व स्वतःच्या घरी सुध्दा येत जात राहायचा या दरम्यान सुरज चौबे हा आपल्या सासुला कामधंदयासाठी पैसे मागायचा त्यामुळे मुलीच्या आईने आपला जावई म्हणून जवळपास रू. ५,००,०००/- त्याला टप्या टप्प्याने कधी सोने विकुन तर कधी नातेवाईकांना मागून त्याला दिले. पण जेव्हा मुलीच्या आईने नंतर पैसे देण्यास नकार दिल्याने सुरज चौबे ने सासुला व बायकोला जातीवाचक शिवीगाळ करणे सुरू केले. त्यामुळे सन २०१९ ला त्याचे विरोधात पत्नी रूची ने जातीवाचक शिवीगाळ केल्याने बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये तकार दिली व गुन्हा दाखल केला. आता आपल्याला पतीशी संसार करावयाचा नाही म्हणून ती यु ए ई ला नौकरी शोधण्याकरीता गेली पण सुरज चौबे हा सासुला विनंती करायचा व रुचीला सुध्दा व्हॉट्सअप द्वारे कॉल करायचा आणि समजवायचा की, मी यानंतर तुला जातीवाचक शिवीगाळ करणार नाही, तुला बायको सारखे प्रमाणे वागवील व वेळ पडल्यास ड्रायव्हर बनून सुध्दा राहील पण तु आली नाहीस तर मी आत्महत्या करील अशील धमकी दयायचा. असाच एके दिवशी तो राजुरा नदीवर जावून रूचीला व्हिडीओ कॉल केला व मी आता नदीत बुडून आत्महत्या करील अशी धमकी दिल्याने रूचीने बल्लारपूर मध्ये येण्यास होकार दिला परंतु तिथे आल्यानंतर तिर-या दिवसापासूनच रूचीला मानसिक त्रास देणे सुरू केले. शिवाय आपल्याला एक बाळ झाल तर माझे आई-वडील सुध्दा तुला स्विकारेल असे म्हणून रूचीला गरोदर केले. ही वार्ता जेव्हा चौबे परिवाराला माहित झाली. तेव्हा त्यांनी रूचीला गर्भपात करण्याकरीता दबाव आणण्यास सुरूवात केली व पती सुरज
चौबे यांनी गर्भपाताच्या गोळया जबरदस्तीने चारण्याचा प्रयत्न केला.

आरोपी चौबे यांनी रूची हिला गर्भपात करण्याच्या गोळ्या आणून सुरज दिल्या त्या नेमक्या कुठुन आणल्या याबद्दल अन्न औषधी प्रशासनाकडे रूची हिने तकार दाखल केली असून महाराष्ट्रात गर्भपाताच्या गोळयांवर प्रतिबंध असतांना संबंधीतावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे पण अजुन पर्यंत या संदर्भात कुठलीही कार्यवाही प्रशासनाने केली नाही. शिवाय रूचीच्या गर्भात मुलगी असल्याबाबत त्यांच्या चार पंडीताकडून लिंग निर्धारीत करण्याबाबत मॅसेज रूचीला पाठविण्यात आलेला आहे त्याबद्दल सुध्दा पो.स्टे. बल्लारपूर येथे तकार केली होती पंरतु त्यावर सुध्दा सुरज चौबे यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले नाही.

परंतु रूचीला गर्भपात करायचा नव्हता त्यामुळे तीने बल्लारपूर पो.स्टे. मध्ये सुरज चौबे विरोधात तक्रार दाखल केली. त्या तकारीवरून पती सुरज चौबे यांचे सह परिवारातील सासु सासरे, दोन्ही नंदा, तसेच त्यांचा जावई यांचे विरोधात गुन्हा दाखल झाला. या गुन्हयामध्ये आरोपी सुरज याला तात्पुरता जामीन मिळाला असून आता न्यायालयाने त्याचे विरोधात अटक वारंट काढलेला आहे. परंतु पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करून आरोपी सुरज याला पकडण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे मला पोलीसांची जबाबदारी दया मी त्याला पकडतो कारण मला ९ वा महिणा सुरू असून जर या दरम्यान आरोपीने माझेवर हमला केल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार हा सवाल करून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी पिडीत महिला रूची चौबे यांनी पत्रकार परिषदेत घेवून पोलीस प्रशासनाकडे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here