शाळा बाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी गोंडपिपरी तालुक्यात विशेष शोध मोहीम
गोंडपिपरी(सुरज माडुरवार)

शालेय शिक्षन व क्रिडा विभाग शासन निर्णय दि.२३ फेब्रुवारी २०२१ नुसार शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी गोंडपिपरी तालुक्यात तहसिलदार के.डी मेश्राम ,संवर्ग विकास अधिकारी शेषराव भुलकुंडे यांनी विशेष शोध मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
कोविड १९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबे स्थलांतरित झाले असून ६ ते १८ वयोगटातील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा मुख्य उद्देश मोहिमेचा असून प्रत्येक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावात,बस स्थानक,बाजारपेठ, वीटभट्टी,कामगार असणाऱ्या ठिकाणी शोधमोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहे.सदर शोध मोहीम १ मार्च ते १० मार्च पर्यंत राबवण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार के.डी मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.