स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृध्दीचा मार्ग : पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांचे प्रतिपादन

0
439

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृध्दीचा मार्ग : पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांचे प्रतिपादन

राजनगट्टा ता. चामोर्शी (सुखसागर झाडे) । विद्यार्थी हाच देशाचा खरा आधार‌ स्तंभ आहे शिक्षण विभागाने शैक्षणिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी विविधांगी ज्ञानाच्या कक्षा वाढवित असल्या तरी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ज्ञानवृध्दी होत असते असे प्रतिपादन चामोर्शी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी केले आहे. नेहरु युवा केंद्र गडचिरोली अंतर्गत छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजगट्टा यांच्या वतीने शिक्षक सहकारी पतसंस्था चामोर्शी येथे सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचे बक्षिस वितरण व तालुकास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम पार पडला त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. दिलीप चौधरी हे होते विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष किशोर कोहळे पुणे येथील ग्लोबल अभ्याषीका संस्थेचे संचालक प्रेरीत कोठारे, जानकाबाई तुरे, राहूल गोलाईत ग्रां.प. सदस्य सुभाष कोठारे वंसत कोहळे आदि मान्यवर उपस्थित होते पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील पूढे बोलताना म्हणाले की स्पर्धा परीक्षा विद्यार्थी जिवनातील महत्त्वपूर्ण ज्ञानप्रवास आहे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येतांना स्वतावर आत्मविश्वास ठेवून भविष्यातील स्वप्नपुर्तीसाठी सकारात्मक प्रयत्न करावे यश नक्कीच मिळेल कोनत्याही स्तरांवर हरने चुकीचे नसुन प्रयत्न न करता हार माणने चुकीचे आहे असेही पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या मनी प्रमाने ग्रामीण विद्यार्थी जन्मताच हरहुन्नरी व परिस्थीती नुसार मेहनती असतात. स्वतामधील कौशल्य ओळखून संधीची वाट न बघता स्वताच संधी तयार करून तिचे सोने करावे असे मार्गदर्शन प्रा.दिलीप चौधरी यांनी केले.संस्थेच्या वतीने तालुका स्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. अ गटातुन ज्ञानेश्वर सुधाकर बुरीवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला साहिल नंदकिशोर सातपुते हा द्वितीय आला असुन महेश अशोक बोदलकर याने तृत्तीय क्रमांक पटकावला आहे. ब गटातुन मिलन नानाजी पोतलजवार हा प्रथम आला असून द्वितीय प्रतिक निलकंठ वासेकर तर तृत्तीय क्रमांक अवंतिका तुळशिराम राऊत हिने पटकविला आहे.कार्यक्रमाचे संचालन अनुप कोहळे यांनी केले प्रास्ताविक विनोद मडावी तर आभार पवन आभारे यांनी केले कार्यक्रमाला स्पर्धेत भाग घेतलेले बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here