धक्कादायक! महिलेचा अल्पवयीन मुलावर बलात्कार

0
1516

धक्कादायक! महिलेचा अल्पवयीन मुलावर बलात्कार

कोर्टाच्या आदेशानंतर महिलेवर गुन्हा दाखल

गोरखपूर: मुली, तरुणीच नाहीत; तर मुलेही सुरक्षित नसल्याचे एका घटनेवरून दिसून आले आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात घडली आहे. एका महिलेने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलावर बलात्कार केला. पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेतली. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी महिलेवर आरोप केला आहे. त्यानुसार, २०१६मध्ये त्यांचा मुलगा शाळेत जात होता. त्यावेळी चांगले शिक्षण मिळावे म्हणून गावातून ते नौगढ येथे आले. तेथे भाडेतत्वावर खोली घेऊन ते राहात होते. त्याचदरम्यान त्यांचा मुलगा शेजारी एका शिक्षिकेच्या घरी शिकवणीसाठी जात होता. शेजारी राहणाऱ्या एका महिलेने त्याला फूस लावून घरी नेले. तिथे त्याच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर पीडित मुलाने आपल्या पालकांना आपबीती सांगितली.

पीडित मुलाचे पालक पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यासाठी गेले. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेऊन न्याय मिळावा अशी विनंती केली. पालकांनी तक्रार केल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. विशेष न्यायाधीशांनी या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, कोर्टाच्या आदेशानंतर आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here