मनीषा मडावीचे यश ! आदिवासी महिला काेणत्याही क्षेत्रात मागे नाही -जेष्ठ लेखिका कुसुम अलाम
🟣🟡गडचिराेली🟢किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी🔴🔵🟤🟢🟡🟡🟡🟠आदिवासी महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत. त्यांना संधी उपलब्ध करून दिली तर त्या कर्तृत्वाने उंच गगन भरारी घेतील. महाराष्ट्रातील अनेक आदिवासी महिला अभिमान वाटण्यासारखे काम करत आहेत. समाजकारण, राजकारण,क्रिडा,साहित्य, वैद्यकीय क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. इतकेच नाहीतर मनिषा मडावीने (ऊईकेने ) गडचिरोली च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिचे भारतातील कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधव मोठ्या अभिमानाने अभिनंदन करीत असल्याचे मत गडचिराेली जिल्ह्याच्या सुपरिचित जेष्ठ लेखिका कुसुम ताई अलाम यांनी आज या प्रतिनिधी साेबत भ्रमणध्वनी वरुन बाेलतांना व्यक्त केले .🟢🟡🟣🟠🔵🟤🟤🔴🟤🔵दरम्यान सोमवार दि.२२फेब्रुवारीला उपराजधानी नागपूरातील आयोजित बिगेस्ट ब्युटी फेस्टीवल स्पर्धेत मनीषा मडावीने भाग घेवून मिसेस इंडिया २०२१चा किताब प्राप्त केला .🟤🟡🔵🟢🔴🟣🟣🟠🟣🔴उपराेक्त पुरस्कार मिळविणां-या मनीषा गडचिराेली जिल्ह्यातील प्रथम आदिवासी महिला अाहे. हे विशेष !