मास्क वापरा ! सुरक्षित राहा ! काेराेनाचा प्रादुर्भाव वाढताेयं ! दंडात्मक कारवाई करण्यांस तपासणी पथके जिल्हाभर फिरु लागली !
🟣🟡🟢चंद्रपूर🟤🔵🔴🟠किरण घाटे 🟣जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर🟢चंद्रपूर जिल्ह्यात परत एकदा काेराेनाचा प्रादुर्भाव वाढताेयं आहे .दिवसागणिक काेराेना रुग्ण संस्खेत वाढ हाेत असल्याचे चित्र जिल्हाभर दुष्टीक्षेपात पडत आहे .याच अनुषंगाने मास्क वापरा सुरक्षित राहा , सुरक्षित अंतराचे नियम पाळा असे आवाहन वारंवार चंद्रपूर जिल्हा प्रशासनच्या वतीने केल्या जात आहे .एव्हढेच नाही तर आता काेराेना नियमांचे उल्लंघन करणां-या नागरिकांवर कारवाई देखिल हाेवू लागली आहे .या बाबतीत प्रत्येकांने आपली काळजी घेणे ही एक महत्वाची जबाबदारी आहे . हे कर्तव्य पार न पाडणा-या व मास्क न वापणा-यावर काहीं नागरिकांवर प्रशासनाने कारवाई करणे आरंभ केले आहे .दरम्यान मास्क न लावता बाहेर फिरणा-या नागरीकांवर पाचशे रुपये दंड ठेवण्यांत आला आहे .यासाठी जिल्हाभर पथके तयार करण्यांत आली असुन त्यांचे देखरेखीचे काम सुरु झाले आहे .या कामात सर्वाधिक पाेलिस विभागाचे योगदान माेलाचे असुन काेराेनाचा प्रादुर्भाव जलद गतीने राेखण्यांसाठी महसुल प्रशासना साेबतच पाेलिस विभाग ,मनपा प्रशासन व इत्तर यंत्रणा कार्यान्वित झाल्या आहे .
