कोविड-१९ मध्ये बीएडच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊन सुद्धा पुन्हा घेतली जात आहे परीक्षा

0
448

कोविड-१९ मध्ये बीएडच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊन सुद्धा पुन्हा घेतली जात आहे परीक्षा

बीएड च्या माजी विद्यार्थ्यांचे होत आहे शैक्षणिक नुकसान

हिंगणघाट/अनंता वायसे : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील बी.एड च्या विद्यार्थ्यांची कोविड-१९ च्या कालावधीत परीक्षा झाली असून तो निकाल लावण्यात यावा व पुन्हा परीक्षा घेण्यात येऊ नये अशी मागणी माजी आमदार प्रा राजू तिमांडे सह बी.एडच्या विद्यार्थ्यांची शिक्षण मंत्री उदय सामंत व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचे कुलगुरू यांना उपविभागीय अधिकारी मार्फत करण्यात आली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मधील बी.एड च्या विद्यार्थ्यांचे पहिल्या सेमची परीक्षा कोविड-१९ च्या कालावधीत झाली असून त्या परीक्षेचा अद्याप निकाल लावण्यात आलेला नाही आणि विद्यापीठाद्वारे की परीक्षा रद्द करून २२ फरवरी २०२१ पासून पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असुन तो निर्णय तात्काळ रद्द करावा आणि कोविड-१९ मध्ये झालेल्या परीक्षेची चाचणी करून त्या परीक्षेचा निकाल लावण्यात यावा.
वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे सर्वत्र जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश काढण्यात आले आहे आणि सर्व शाळा महाविद्यालय बंदचे आदेश देण्यात आले आहे. असे असताना सुद्धा विद्यापीठ परीक्षा घेत आहे.
माजी विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली तर निकाल लागण्यास वेळ होईल त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. तरी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली त्यावेळी गौरव तिमांडे, प्रवीण नगराळे, प्रतीक पाटील, हर्षल बागडे,मंगेश हिवंज,धनंजय साळवे,आशियाना शेख इत्यादीनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here