भारतीय कामगार सेनेचे माजी अध्यक्ष श्री. रमाकांत मोरे यांचे दुःखद निधन

0
489

भारतीय कामगार सेनेचे माजी अध्यक्ष श्री. रमाकांत मोरे यांचे दुःखद निधन

Impact24News Team
चिपळूण : शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि भारतीय कामगार सेनेचे माजी अध्यक्ष श्री. रमाकांत मोरे यांचे वयाच्या 87 व्या वर्षी लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण येथे अल्पशा आजाराने आज शनिवारी सायंकाळी 6.45 वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवार दिनांक 21 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता त्यांच्या सुमन या निवासस्थानापासून निघेल.
कै. रमाकांत मोरे साहेब यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून संघटनेसाठी भरीव स्वरूपाचे योगदान दिले. या कार्याची दखल घेऊन वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर तब्बल 13 वर्ष भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्यांनी त्यांच्या टेरव येथील मूळ गावात जय भवानी एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना करून सुमन विद्यालय टेरव हे विद्यालय सुरू केले. तसेच टेरव गावच्या विकासासाठी भरीव स्वरूपात योगदान दिले. त्याचबरोबर ते अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थांवर कार्यरत होते. शिवसेनेचा एक अभ्यासू व कार्यतत्पर नेता जाण्याने सर्व क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात एक भाऊ, पत्नी दोन मुलगे, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here