आजअखेर 1659 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

0
345

कोल्हापूर,दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज सकाळी 10 वाजेपर्यंत 596 प्राप्त अहवालापैकी 373 निगेटिव्ह तर 157 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (42 अहवाल प्रलंबित, 23 जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह, तर 1 अहवाल नाकारण्यात आले.) अँन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 69 प्राप्त अहवालापैकी 42 निगेटिव्ह आहेत, तर 24 पॉझीटिव्ह असे एकूण 181 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 4556 पॉझीटिव्हपैकी 1659 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 2769 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 181 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड-3, हातकणंगले-3, कागल-1, करवीर-3, शाहूवाडी-12, नगरपालिका क्षेत्र- 63, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 93 व इतर जिल्हा व राज्यातील – 3 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 107, भुदरगड- 102, चंदगड- 344, गडहिंग्लज- 207, गगनबावडा- 9, हातकणंगले- 324, कागल- 80, करवीर- 515, पन्हाळा- 196, राधानगरी- 152, शाहूवाडी- 260, शिरोळ- 132, नगरपरिषद क्षेत्र- 1013, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-1052 असे एकूण 4493 आणि इतर जिल्हा व राज्यातील 63 असे मिळून एकूण 4556 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 4556 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1659 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 128 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 2769 इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here