गोंडपिपरी तालुक्याच्या विकासासाठी सदैव तत्पर – आमदार सुभाष धोटे
नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा सत्कार सोहळा संपन्न
बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष राजू झाडेंचा कॉग्रेस प्रवेश
गोंडपिपरी(सुरज माडुरवार)
तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचाचा सत्कार आमदार सुभाष धोटे यांचे हस्ते शुक्रवारी पार पडला.गावविकासाचे कार्य करतांना सरपंचांनी जबाबदारी आणि कल्पकतेने काम करणे आवश्यक आहे.तालुका स्तरावरील सर्व सरपंचांनी एकत्रित येऊन एक संघटन तयार करून,आपआपसात विचारांचे आदानप्रदान करावे.शासकीय योजना,विविध उपक्रम गावात राबवावेत.ग्रामिण विकासासाठी आपण सर्व प्रकारचे आवश्यक सहकार्य निश्चितपणे करणार असल्याचे मत आमदार धोटे यांनी व्यक्त केले.यावेळी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सांगितले की, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी मिळून गाव विकासासाठी परिश्रम घेतले पाहिजे.अडचणी येत असतील तर अनुभवी व्यक्तीच्या अनुभवाचा उपयोग करून घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले.राजिवसिंह चंदेल,अशोक रेचनकर,सरपंच देवीदास सातपुते, नगराध्यक्ष सपना साखलवार,कमलेश निमगडे आदिंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, अशोक रेचनकर, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे,राजिवसिंह चंदेल,संतोष बंडावार, गौतम झाडे,बबलू कुळमेथे,अस्लम शेख,विनोद नागापूरे, सिनु कंदणुरीवार,साईनाथ कोडापे,जितेंद्र गोहणे,प्रदीप झाडे, कुरवटकर, जिल्हा महासचिव कमलेश निमगडे, परिसरातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच, सदस्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सचिन फुलझेले यांनी केले. प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूजी येलेकर यांनी केले.
राजू झाडेंचा काँग्रेस प्रवेश गोंडपिपरी येथील भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजू झाडे यांनी काल (दि.१९) रोजी शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यांनी यापुढील काळात पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासह संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.