छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान व प्रबोधन शिबिर, २६ युवकांनी केले रक्तदान!

0
483

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान व प्रबोधन शिबिर, २६ युवकांनी केले रक्तदान!
🟢🔶🟣🟡राजूरा🔵🟡🔴🟢🔶🟢🟤🟣किरण घाटे🟡🟢🔶🟣
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त वरूर रोड येथे राष्ट्रीय सेवा योजना पथक श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा व युवा ग्रुप वरुर रोड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी २६ रक्तदात्यांनी रक्तदान करून मोलाचे कार्य केले. या रक्तदान शिबिराला आदर्श कोठारवार, विशाल शेंडे , मंगेश भोंगळे, कार्तिक सिडाम, महेश वसाके यासह अनेक युवकांचे सहकार्य लाभले. याचदरम्यान सायंकाळी ७ वाजता गांधी चौक वरुर रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.युवा कवी आदित्य आवारी यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित केली होती, या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. समीक्षा जीवतोडे प्रथम , समीक्षा मोडक द्वितीय तर श्रुती बोरकर या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला. आणि सहभागी विद्यार्थ्यांना शिवाजी कोण होता हे पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच भास्कर वांढरे, विशाल शेंडे व किशोर भोंगळे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. सिद्धार्थ चव्हाण, आणि नामदेव देवकते यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर गावकऱ्यांना व विद्यार्थांना अतिशय प्रभावी आणि मोलाचे मार्गदर्शन केले. यांच्या प्रभावी व्याख्यानाबद्दल गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह ग्रंथ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बंडू भोंगळे पुलिस पाटील वरूर रोड, आबाजी धानोरकर सदस्य ग्रामपंचायत कार्यालय वरुर रोड, रामदास पूसाम पंचायत समिती सदस्य राजुरा, इंडियन आर्मीचे जवान भास्कर वांढरे, सिद्धार्थ चव्हाण, नामदेव देवकते कार्यक्रमाला उपस्थित होते. 🔴🟢🔴🔵🔵🟡🟡🟤🔶या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल शेंडे , साहिल मडावी, प्रज्वल बोरकर, गौरव हिवरे, मयुर जानवे, करण उरकुडे, प्रवीण चौधरी, सौरभ हिवरे, महेश वसाके यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here