नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करा : तहसीलदार हरीश गाडे
राजुरा । सद्यास्थितीत चंद्रपूर जिल्हा अंतर्गत कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव बघता , कोरोना विषाणुचा संसर्ग देिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी दिनांक (दि. 17 फेब्रु) रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने राजुरा तहसिल अंतर्गत येणारे पंचायत समिती , पोलीस स्टेशन अधिकारी , ग्रामीण रुग्णालय राजुरा , तालुका आरोग्य अधिकारी व नगर परिषद राजुरा यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक तहसिल कार्यालय , राजुरा या ठिकाणी पार पडली, सदर बैठकीस हरीश गाडे तहसिलदार , राजुरा यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन होत आहे किंवा नाही . तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत नागरी व ग्रामीण प्रशासनास सुचना दिल्या तसेच तहसिल हद्दीतील लग्न व इतर तत्संग कार्यक्रमासाठी तालुक्यातील मंगल कार्यालये, सभागृह यांच्या मालकांची सभा घेऊन त्यांना जिल्हाधिकारी यांच्या निर्देशांचे पालन करण्याकरीता सुचित करुन साथरोग अधिनियम 1896 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधिल तरतुदी अन्वये उक्त निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधित सभागृहामंगल कार्यालये, लॉन, जागा यांचे मालकाव्यवस्थापक यांच्यावर पहिल्या चुकीसाठी, उल्लंघनासाठी पहिला दंड रु . 5000, दुसरा दंड रु . 10000, व तिसरा दंड रु 20000 याप्रमाणे दंड आकारण्यात येईल . तसेच याव्यतिरीक्त आवश्यकतेनुसार सदर सभागृह, मंगल कार्यालये, लॉन, जागा सील करणे, गुन्हे दाखल करणेसाठी पात्र राहतील. तसेच कार्यक्रमाचे आयोजक हे सुध्दा सदर उल्लंघनासाठी रु 10000 इतक्या दंडास पात्र राहतील. याबाबतच्या सुचना संबंधिताना देण्यात आल्या . तसेच या प्रेसनोटव्दारे तहसिलदार, राजुरा यांनी नागरीकांना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजनामध्ये सहभागी होऊन सार्वजनिक ठिकाणी वावरतांना सर्वांनी मास्क परिधान करुन सामाजिक अंतर पाळुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले .
