संत सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त समान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षिस वितरण.

0
524

संत सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त समान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षिस वितरण.

३ जानेवारी सावित्रीबाई फुले व १२ जानेवारी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भव्य सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केल्या गेली होती. व ज्या विद्यार्थ्यांचा कोरोनामुळे वर्ष फुकट गेला व त्याच्या ज्ञानात काहीतरी भर पडावी या उद्देशाने एक आगळा वेगळा उपक्रम श्री भाऊरावजी रुडे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व काही विद्यार्थ्यांनी त्यामध्ये प्राविण्य मिळविले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक चेतन किशोर रत्ने, द्वितीय क्रमांक ईश्वर प्रल्हाद रूडे व तृतीय क्रमांक हर्षल सदाशिव सावंत या विद्यार्थ्यांनी पटकविला व तसेच काही विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविले. ज्या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आला त्याला १००१ रुपये रोख, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणारे त्यांनासुद्धा अनुक्रमे ७०१ रुपये व ५०१ रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हा सगळा सोहळा महाविद्यालयाने संत सेवालाल महाराज यांच्या २८२ व्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पार पाडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री. गणेश रुडे सर यांच्या मातोश्री धुरपताबाई रुडे व प्रमुख पाहुणे श्री. शेषराव डोंगरे साहेब व श्री. भाऊरावजी रुडे साहेब, संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ. वर्षाताई गणेश रुडे, ज्योतीताई रुडे, विमलबाई चांदावत, श्री गोपीचंद रुडे, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. दत्ता शेरे सर, प्रा. श्री. समीर मलनस सर, प्रा. श्री. शुभम नाईक सर, प्रा. श्री. निरंजन राठोड सर, प्रा. श्री. बोडखे सर प्रा. श्री. शेगर सर व प्राध्यापिका कु. मीनाक्षी राठोड मॅडम व लॅब सहाय्यक श्री. अविनाश रुडे, लिपिक श्री. विशाल सावांगेकर व कर्मचारी वर्ग श्री. अंकज रत्ने, श्री. पुरुषोत्तम राठोड, श्री.अतुल राठोड, श्री. अर्जुन धूर्वे व तसेच गावातील काही प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यामधे श्री.मारोती डोंगरे श्री.विजय भानावत श्री.सुभाष वाघमारे श्री.दत्ता पाईकराव श्री.गजानन रत्ने श्री.मोहन पवार श्री.दशरथ जयस्वाल हे सुध्दा उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव श्री. गणेश रुडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच श्री. शेषराव डोंगरे साहेबांनी सुध्दा मार्गदर्शन केले खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here