आम परिवार सवांद यात्रेला आरंभ ! अनेक भागात धनंजय शिंदे तथा किशाेर मंध्यानच्या भेटी !

0
532

आम परिवार सवांद यात्रेला आरंभ ! अनेक भागात धनंजय शिंदे तथा किशाेर मंध्यानच्या भेटी !

🔴चंद्रपूर🟠 किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी 🟢🔶🔵🟤🟣🔴🟠🟡आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या संघटनात्मक बांधणीला मजबूत करण्याच्या हेतूने तसेच ग्राम पंचायत पातळीवर निवडणूक जिंकून आलेल्या सदस्यांचे अभिनंदन करण्याच्या उद्देशाने आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे मुंबई तसेच आप महाराष्ट्रचे उपाध्यक्ष किशोरजी मंध्यान मुंबई यांचा 13 फेब्रुवारी 2021 पासून महाराष्ट्र दौरा चालू असतांनाच दिनांक 17 फेब्रुवारी 2021 ला ते चंद्रपुर जिल्हा दौऱ्याला आले . 🟠🔴🔶🟡🟢🟣🟤🔵भद्रावती, वरोरा, चिमूर, सिंदेवाही, बल्लारपूर अश्या अनेक ठिकाणी गाव भेटी देवून सभा घेण्यात आल्या या शिवाय आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा महानगर क्षेत्रातील झोन क्रमांक 2.चंद्रपुर येथील पक्षाचे जिल्हा महानगरचे संघटनमंत्री सुनील रत्नाकर भोयर यांचे जनसंपर्क कार्यालय,℅सुनील रत्नाकर भोयर, विठ्ठल मंदिर समोर,विठ्ठल मंदिर वॉर्ड क्रमांक १.चे उदघाटन पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे मुंबई तसेच पक्षाचे उपाध्यक्ष किशोरजी मंध्यान;मुंबई यांचे शुभ हस्ते बुधवार ला दि. 17 फेब्रुवारी 2021 ला उद्घघाटन करण्यात आले.
🟢🔶🟡🔴🟠🟣🔵🟤🔶 या प्रसंगी पक्षाचे महानगर जिल्हा संयोजक प्रशांत येरने; संघटनमंत्री सुनील रत्नाकर भोयर; सहसंयोजक योगेश आपटे जिल्हा ग्रामीणचे संयोजक सुनील मुसळे, सचिव संतोष दोरखंडे;कोषाध्यक्ष भिवराज सोनी; महानगर सहसचिव अजय डुकरे ;सहसंयोजक सिकंदर सागोरे ; सहसंयोजक बबन कृष्णपल्लीवार; कोषाध्यक्ष अशोक आनंदे ,कार्यकर्ते पोटेजी, दिलीप तेलंग, भद्रावती तालुका अध्यक्ष सोनल पाटील विठ्ठल मंदिर वॉर्ड मधील झोन 2 चे अध्यक्ष संदीप तुरक्याल तसेच सचिव वॉर्डातील नागरिक दत्तात्रय महादूरकर, वैभव देसाई, अशोक अहिरकर आणि असंख्य युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here