ग्रामपंचायत घारगांव येथे सरपंच पदाची बिनविरोध निवड

0
237

ग्रामपंचायत घारगांव येथे सरपंच पदाची बिनविरोध निवड

ग्रामपंचायत घारगांव येथे आज दिनांक १६/०२/२०२१ रोजी सरपंच व उपसरपंच पदाची बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली. सरपंच पदावर श्री.विवेक शेषराव भगत तर उपसरपंच म्हणून श्री. कबिरदास भय्याजी आभारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य श्री.लोमेश भगत, देवाजी भोयर,सुषमा आभारे, सारिका आभारे,मनीषा मंगर ,मुक्ताबाई शेंडे,दुर्गा भोयर या सदस्यांनी सहकार्य केले.या सर्व निवडणूक प्रक्रीयेत माननीय सौ. कविता प्रमोद भगत जि.प.सदस्या गडचिरोली तसेच प्रमोदभाऊ भगत माजी पं.स.सदस्य यांचे फार मोठे योगदान व सिंहाचा वाटा असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. त्यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत करीत त्यांचे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी उपस्थित मान्यवरांचे व सर्व मतदार बंधू-भगिनींचे आभार मानले.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here