आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते  फिरते पशु चिकित्सालयाचे लोकार्पण 

0
418
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते 
फिरते पशु चिकित्सालयाचे लोकार्पण 
चंद्रपूर : पशुधन हे शेतकऱ्यांचे कुटुंब असून, पशुधनाच्या आरोग्यासाठी आणि जोपासणेसाठी पशु चिकित्सालय हे महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले. त्या भद्रावती पशुवैद्यकीय रुग्णालयात फिरते पशु चिकित्सायलच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजपूत, सहाय्यक उपयुक्त डॉ. कडूकर, डॉ. एकता शेडमाके, पशुधन अधिकारी डॉ. युसूफ शेख यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि,
पशुधनाची जोपासणा करणे सर्वार्थाने महत्वाचे असून त्यांना पोषक पशुखाद्य, औषधोपचार, चारा आदी गोष्टी वेळीच उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देवून आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, मी शेतकऱ्याची मुलगी आहे.  शेतकऱ्यांसाठी जे – जे करणे शक्य आहे, ते करण्यासाठी मी वचनबध्द राहील. शेतकरी मेहनती व कष्टाळू असून तो ऊन, वारा व पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र शेतात राबतो आहे. अशा माझ्या शेतकऱ्याला सहाय्य करण्याची संधी मला मिळाली असून ती निश्चितपणे पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. यावेळी अन्य मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here