करंजित आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

0
355

करंजित आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

लवकरच सौरक्षण भिंत,सौचालयाच्या कामाला निधी उपलब्ध करू सुभाष धोटे यांचे आश्वासन

गोंडपिपरी(सुरज माडुरवार)

दि.१३ शनिवार ला करंजित सभागृह बांधकाम इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.गुरुदेव सेवा तत्वज्ञान मंडळ करंजी गेल्या २२ वर्षांपासून गावात धार्मिक,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.मंडळाची मागणी लक्षात घेऊन माजी आमदार संजय धोटे यांनी सभागृह बांधकामासाठी ८ लाख रुपयांची निधी उपलब्ध करून दिली.आज गोंडपीपरि तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन आहे.त्याच अनुषणगाने करंजी येथील सभागृहाचे थाटात लोकार्पण करण्यात आले यावेळी मंगळाची मागनी लक्षात घेऊन लवकरच करंजी येथील सभागृहाला सौरक्षण भिंत व सौचालय बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देऊ असा शब्द आमदार सुभाष धोटे यांनी दिला.यावेळी ठाणेदार संदिप धोबे,बाजारसमिती उपसभापती अशोक रेचनकर,करंजीच्या सरपंच पेटकर,ग्रा.प.स समीर निंमगडे,सचिन तेलकापल्लीवार,माजी सरपंच ज्योती चीचघरे,आशिष निंमगडे,अशोक रेचनकर,सरपंच देविदास सातपुते,हरी मडावी,सुरज भोयर ,काँग्रेस ता अध्यक्ष तुकाराम झाडे,देवेंद्र बट्टे, नामदेव सांगळे,बांधकाम विभागाचे उपभियंता शंभरकर,कोवे,यांच्यासह गावातील शेकडो नागरिकांची व गुरुदेव मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती होती.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here