अगरबत्ती प्रकल्पातून शेकडो परिवारांना रोजगार दिल्याचे समाधान!!…आमदार डॉ देवरावजी होळी

0
221

अगरबत्ती प्रकल्पातून शेकडो परिवारांना रोजगार दिल्याचे समाधान!!…आमदार डॉ देवरावजी होळी

चामोर्शी येथे मेक इन गडचिरोली च्या पुढाकारातून भव्य अगरबत्ती क्लस्टर चे उदघाटन

दिनांक १२फेब्रुवारी २०२१ला चामोर्शी येथील गोंड मोहल्ला (संताजी नगर प्रभाग) भव्य अगरबत्ती प्रकल्पा अंतर्गत, मेक इन गडचिरोलीच्या माध्यमातून आपण जिल्ह्यातील शेकडो परिवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे दिलेले वचन पूर्णत्वास येत असून आज येथील एकत्रित सत्तर अगरबत्ती मशीन युक्त अगरबत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून ,येथेच अगरबत्तीचा सूगंधित मसाला तयार करण्यात येणार आहे व एकाच जागी काम करून शेकडो महिलांना मोठा आर्थिक आधार मिळणार असल्याचे व गडचिरोली विधानसभा मतदार संघातील समस्त गावात अश्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्याचा संकल्प आहे असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ, देवरावजी होळी यांनी केले मेक इन गडचिरोली अंतर्गत चामोर्शी येथे अगरबत्ती प्रकल्प शुभारंभ प्रसंगी केले
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रमेशजी बारसागडे, चामोशीचे तहसिलदार अवतारे साहेब, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी चंद्रशेखरजी कोहडे, जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बराटे, एसीबी चे उपअधीक्षक सुरेंद्रजी गरड, आत्मा चे प्रकल्प संचालक कराडे साहेब, अग्रणी बँकेचे एल डी एम टेंभुर्णेजी, बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक अभयसिंग चौधरी, जिल्हा उद्योग केंद्राचे अतुलजी पवार, आर टी सी चे संचालक चेतनजी वैद्य, काटकर साहेब , हेमंत भाऊ मेश्राम, चामोशी पोलीस निरीक्षक पाटील साहेब जयरामजी चलाख, प्रामुख्याने उपस्थित होते*
मेक इन गडचिरोलीच्या माध्यमातून सुरू होणारा हा अगरबत्ती प्रकल्प विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प असून या प्रकल्पाचे संचालक आशिषजी पिपरे ,सौ सोनाली ताई आशिष पीपरे यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रकल्पाच्या माध्यमातून चामोर्शीसह जिल्ह्यातील नागरिकांनाही त्यातून रोजगार मिळत असल्याने त्याचे आपणाला समाधान असल्याचे आमदार डॉ देवराव जी होळी यांनी म्हटले आहे
आतापर्यंत मेक इन गडचिरोली च्या माध्यमातून अनेक प्रकल्प सुरू झालेले असून उद्योग धंद्यांच्या माध्यमातून स्थानिक युवक व महिलांना रोजगार मिळणे सुरु झाले आहे .या अगरबत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून शेकडो परिवारांना रोजगार उपलब्ध झालेला असून या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात एक क्रांती निर्माण होईल व आपण जिल्ह्यात श्वेत क्रांती ,नील क्रांती ,हरित क्रांती , घडवून आणल्या शिवाय गप्प बसणार नाही असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रशेखर मस्के , ओमदास झरकर व युवा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here