चामोर्शी शहरात युवा नेतृत्व आशिष भाऊ पीपरे यांचा पुढाकाराने संताजी नगर येथील क्रीडांगणाचा कायापालट

0
412

चामोर्शी शहरात युवा नेतृत्व आशिष भाऊ पीपरे यांचा पुढाकाराने संताजी नगर येथील क्रीडांगणाचा कायापालट

शहरातील बालगोपाल यांच्या खेळण्याचा माहेरघर बनतोय पडीत क्रीडांगण

स्वतः पुढाकार घेऊन शासकीय मदत न घेता सात लक्ष रुपये स्वतः खर्च करून साकारला बालगोपाल यांच्या किलबिलाटाचे केंद्र 

चामोर्शी -येथील गोंड मोहला ( संताजी नगर प्रभाग )
येथील युवा नेतृत्व कॉलेज जीवनापासून समाजसेवेची आवड आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी व येथील युवकांचा आदर्श आशिष अरुण पिपरे यांच्या कार्याची दखल नक्कीच घ्यावी लागेल कारण आशिष ने जे करून दाखवले ते नक्कीच खूप मोठे सामाजिक कार्य आहे
येथील संताजी नगर येथे असलेली पडीत जागा ज्या ठिकाणी लोक शेण टाकत होते ज्या जागेवर अनेक लोकांनी अतिक्रमण केले होते ती जागा भांडण करून स्वतः विरोध पत्करून अतिक्रमण मुक्त केले व सर्वसामान्य नागरिकांना येथे शेण टाकण्यास मज्जाव करून खूप मोठा लोकसहभाग निर्माण करून स्व, खर्चाने मुरूम टाकले सदर रिकाम्या जागेस क्रीडांगणचा रूप दिला येथेच युवकांची सामाजिक संस्था निर्माण केले आशिष चे स्वप्न होते येथे बालगोपाल यांचे किलबिलाट निर्माण होण्यासाठी विविध खेळांचे साहित्य खरेदी करावे यासाठी शासकीय यंत्रणेने कडे अनेक हेलपाटे खाल्ले पण जमले नाही
शेवटी स्वतः चा विचार न करता कुटुंबाचा विचार न करता
आपल्या सासरे बुवा यांनी दिलेला सात लक्ष रुपये येथे प्रभागातील बालगोपाल यांचा किलबिलाट निर्माण होण्यासाठी विविध खेळांचे साहित्य खरेदी करण्यासाठी खर्च केले आज नेहमीच येथे विविध प्रभागातील शेकडो बालगोपाल विविध खेळांचा आस्वाद घेण्यासाठी व मनोरंजनासाठी येत आहेत आज दररोज हा क्रीडांगण छोट्या बालगोपालानी फुललेला दिसून येत आहे आणि सदर क्रीडांगणावर आमदार डॉ देवराव होळी यांच्या हस्ते स्वतः येथील युवकांच्या सहभागाने विविध प्रजातीचे वृक्षाचे रोपण केले आहे
लवकरच हा क्रीडांगण शहरातील सुसज्जित क्रीडांगण चे रूपाने नावारूपास येत आहे ! येथेच संताजी बहुउददेशीय सामाजिक संस्था चे वतीने गोरगरीब जनतेसाठी इंग्रजी माध्यमाचे मोफत कॉन्व्हेन्ट स्कूल साकारण्याचे आशिष भाऊ पीपरे यांचे स्वप्न आहे, क्रीडांगणाचे अनेक उर्वरित काम बाकी आहे
या क्रीडांगणाचे सुद्धा आज दिनांक 12/2/2021 ला गडचिरोली चे आमदार डॉ देवराव होळी व जिल्हाधिकारी दीपक जी सिंगला यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले
या क्रीडांगणावर बालगोपाल यांचे हास्य फुलवण्यासाठी आशिष भाऊ यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे , एस,टी बस मध्ये एक रुपये परत घेण्यासाठी अर्धा तास वेळ घालवणारे अनेक मंडळी आहेत व फक्त समाज हिताच्या गोष्टी करून स्वतःचा प्रसिध्दी करून समाजाला काहीही न देणारे अनेक मंडळी आहेत समाजाला सत्तर रुपये देणगी देऊन सत्तर लोकांना माहिती देणारे पन अनेक आहेत पण आशिष ने चक्क सात लक्ष रुपये एका झटक्यात खर्च केले फक्त बालगोपालांचे किलबिलाट निर्माण होण्यासाठी? मित्रांनो कलेजा लागतो यासाठी?
त्यांच्याकरीता आशिष भाऊ नक्कीच गडचिरोली जिल्हा चा युथ आयकॉन नक्कीच आहे
आज आशिष चे या कार्यासाठी पंचायत राज कमेटी मीटिंग येथे व्यस्त असलेले गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी आशिष भाऊ यांच्या भावी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here