चेक आष्टा ग्रामपंचायत वर गोंडवाना गणतंत्र पार्टी चा झेंडा

0
582

चेक आष्टा ग्रामपंचायत वर गोंडवाना गणतंत्र पार्टी चा झेंडा

चेक आष्टा ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ.कांताताई फुलचंद मडावी तर उपसरपंच श्री.जगनाथ तुळशिराम येलके यांची बहुमताने निवड…….
———————–+++———–
चेक आष्टा (१२/०२/२१)
मनी वसे ते स्वप्नी दिसे या म्हणी प्रमाणे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सौ.कांताताई फुलचंद मडावी आपल्या तिन उमेदवारांसह विजय झाले आणि त्यातच त्यांचे ग्रामपंचायत चेक आष्टा गावचे सरपंच होण्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसले. ते दुसऱ्यांदा ग्रामपंचायत चेक आष्टा चे सरपंच म्हणून पद भूषविणारे आहेत.
तर श्री. जगन्नाथ तुळशिराम येलके उपसरपंच म्हणून पद भूषविणारे गोंडवाना गणतंत्र पार्टी चे तालुका अध्यक्ष व या गावातील प्रथम मानकरी ठरलेले आहेत.
सरपंच व उपसरपंच पदावर विराजमान झालेले दोन्ही व्यक्ती अत्यंत साधे, सरळ व मनमिळावू असल्यामुळे गावातील जनतेनी त्यांचे खूप खूप अभिनंदन केले.आणि आदर्श गाव म्हणून असलेली ओळख कायम रहावी , विकासात्मक वाटचाल करावी यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here