पदवीधर अंश कालीन कर्मचा-यांनी  चंद्रपूरचे सहाय्यक संचालक भैय्याजी येरमे यांची घेतली भेट ! सादर केले निवेदन!

0
803

पदवीधर अंश कालीन कर्मचा-यांनी  चंद्रपूरचे सहाय्यक संचालक भैय्याजी येरमे यांची घेतली भेट !

सादर केले निवेदन! 🟨🟣🟢चंद्रपूर🟣🟨🟣🌀किरण घाटे🟣आज
गुरुवार दि.११ फेब्रुवारीला सकाळला चंद्रपूरचे जिल्हा काैशल्य विकास ,राेजगार व उद्याेजकता विभागाचे संचालक भैय्याजी येरमे यांची चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी-चिमूर येथील काही पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी भेंट घेवून त्यांना आपली व्यथा सांगितली. ब-याच वर्षांपासून रिक्त असलेल्या जागांवर व शासकीय सेवेत सामावून घ्या अशी शासनाने अनुमती देऊनही पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना रुजू केले नसल्याने त्या कर्मचाऱ्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. अश्या आशयाचे एक निवेदन भेटी अंती त्यांना सादर केले 🟨🟣🛑🛑🟡🌀💠🟨🟧दरम्यान यावर उपाय निघावा म्हणून आम आदमी पक्षाचे चिमूर-नागभीड विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष डॉ .अजय पिसे हे सुरुवाती पासून या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करीत आहे हे येथे उल्लेखनीय आहे.🟨🟣🌀🛑🟨🟡🟨💠🟡🟪दरम्यान ते या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहून वेळोवेळी माहिती घेत आहेत. वारंवार अर्ज करून तसेच,जिल्ह्याच्या वा-या करूनही प्रशानाकडून दुर्लक्षित झालेले हे कर्मचारी आता पुर्णता हवालदिल झालेले दिसत आहे. 🟨🌀🛑🟩☀️💠🟨🟪डॉ. अजय पिसे यांनी यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठांसोबत बोलणी केली . आम आदमी पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे व जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी यांनी यांच्या या अतिशय महत्वाच्या प्रश्ना बाबत आवाज बुलंद केला आहे .🟣🌀💠🟧🛑🟡🟩🟨💠त्यांनी स्वता जिल्हाधिकारी कार्यालयातून या प्रकरणाचा पूर्णपणे आढावा घेतला. त्यात असे दिसुन आले की प्रशासनाकडून दुर्लक्ष व टाळाटाळ झालेली दिसत आहे. 🟨💠🟩🟡🛑🟧🌀🟣🛑सुनिल मुसळे यांनी सदरहु पदविधर अंशकालीन लोकांना लवकरात लवकर रुजू करून घ्यावे याबाबतची मागणी रेटुन धरली.आहे .🟣🟡🟨🌀🔶🟧🛑
बेरोजगारीने आधीच त्रस्त झालेले हे अंशकालीन कर्मचारी शंभर कि .मी .चा प्रवास
वारंवार करू शकत नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवून मेटाकुटीला आलेल्या ह्या कर्मचाऱ्यांसाठी आपचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे व जिल्हाकोषाध्यक्ष भिवराज सोनी यांनी येत्या १० दिवसांत जर या बाबत योग्य निर्णय झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर सर्व आपच्या पदाधिकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाचा बसु असा इशारा या आधीच दिला आहे .

🟪🟩🟨सहाय्यक संचालक यांना भेट दिलेल्या शिष्टमंडळात भीमराव बनसोड, प्रकाश पाटील, भारत बोकडे, राजेंद्र नन्नावरे, माणिक पिसे, मनाेहर वासनिक, प्रशांत रामटेके, राष्ट्रपाल डांगे, कचरू पाटील, बाबा मेश्राम, पोईतराम गभने पत्रू पाटील प्रमाेद चाैखे लक्ष्मण मेश्राम व वनदेव दुधे यांचा समावेश हाेता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here