ब्रम्हपुरी तालुक्यातील नाभिक समाज च्या महिलेने रोवला मानाचा तुरा
चंद्रपूर जिल्हातील ब्रम्हपुरी तालुक्यातील नाभिक समाजाची पहिली महिला सरपंच
ब्रम्हपुरी/प्रतिनिधी । तालुक्यातील ग्रा. प. खेड येथील सौं ज्योती ताई सचिन मेश्राम ह्या पहिल्यांदाच गावातील राजकारणा मध्ये पाय ठेवला, आणि थेट सरपंच पदाला गवसणी घातली. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नाभिक समाजामध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून समाजामध्ये त्यांच्याबद्दल अभिमान वाढलेला आहे.
त्या उच्चाशिक्षित असून त्यांना पूर्वी पासूनच सामाजिक कार्याबद्दल आवड आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा सदूपोयोग करून गावाचा सर्वांगीण विकास करून आपल्या समाजापुढे आदर्श निर्माण करावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी तर्फे सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.