कामगाराचा अपघाती म्रूत्यू ! सुरज ठाकरेच्या प्रयत्नातुन मिळाली म्रूतकाच्या कुंटुबाला मदत !

0
543

कामगाराचा अपघाती म्रूत्यू ! सुरज ठाकरेच्या प्रयत्नातुन मिळाली म्रूतकाच्या कुंटुबाला मदत !

🟣चंद्रपूर💠किरण घाटे🟣💠काल शुक्रवार दि.५फेब्रुवारीला गाडेगाव विरूर येथील ए एस डी सी गाेलच्छा कंपनीत सकाळी २:३०वाजताच्या दरम्यान काम करीत असतांना सचिन गणपत कर्मणकार नावाच्या ३३ वर्षीय कामगार डंपर खाली येवून (सदरहु अपघातात )गंभीर जखमी झाला .🟣💠🟪🔶🟩त्याला तात्काळ कंपनीत कार्यरत कामगारांनी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता नेण्याचा प्रयत्न देखिल केला परंतु त्याचे नशिबाने त्याला साथ न दिल्यामुळे वाटेतच त्याचा म्रूत्यु झाला . 🛑🟡🌀🌼🟩या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर अक्षरशा दुखाचा डाेंगर काेसळला
मृतक व्यक्तीच्या कुटुंबात १ वर्षाचं चिमुकल बाळं व त्याची पत्नी आहे, त्यांचा आधारस्तंभ गेल्याने त्यांच्या भविष्याच विचार करता या कडे सहानभूती पुर्वक लक्ष पूरवून युवा स्वाभिमान पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी उपराेक्त संदर्भात गावकरी तथा जयभवानी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने मृतक व्यक्तीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरिता कंपनी प्रशाशनाकडून अंतिम संस्कारा करिता ५०,०००/- रुपये रक्कम राेख मिळवून दिले🟪💠🟣🟡🛑. साेबतच ३०,०००००/- (तीस लाख रुपये ) नुकसान भरपाई मदत मिळवून दिली .त्या राेख रकमेतील १५,०००००/- लाख रुपये त्वरीत मृतकाच्या पत्नीच्या खात्यात जमा केले असल्याचे व्रूत्त आहे .🛑💠🔶🛑🟡🟣दरम्यान याच घटनेतील मृतकाच्या भावाला नौकरी मिळावी असा कंपनी प्रशासना समोर प्रस्ताव सादर केला आहे . 🟣🌀🟧🟨💠🟪तो प्रस्ताव कंपनीने मान्य केला नाही परंतु लेखी स्वरूपात भविष्यात नोकरी मिळेल असे लिहून दिले असल्याचे समजते. 🟩🟢🔶🟣🟪या वेळी रोशन हरबडे, अविनाश काकडे, आशिष कुचनकर, रवींद्र पासवान, निखिल बजाईत, राहुल चव्हाण, अजवान टाक, मुकेश मेहता या शिवाय युवा नेते राजू झोडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here