गोंडपिपरीत भव्य खुले टेनिस क्रिकेट सामने

0
516

गोंडपिपरीत भव्य खुले टेनिस क्रिकेट सामने

A.V.N क्रिकेट क्लब गोंडपिपरी च्या वतीने आयोजन

गोंडपिपरी । गोंडपीपरी नगरीत A.V.N क्रिकेट क्लब गोंडपिपरी च्या वतीने भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. गोंडपिपरी नगरीत असलेल्या भव्य क्रीडा संकुल मैदानात हे सामने दिनांक 6 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार असून हे सामने अंतिम सामन्या पर्यंत चालणार आहेत. या सामन्याचे प्रथम पारितोषिक AVN क्रिकेट क्लब गोंडपिपरीच्या सौजन्याने ५१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३१ हजार रुपये असे पारितोषिक विजयी संघाला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे स्व.चंद्रकुमार माणिकचंद जैन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अजित कूमार माणिकचंद जैन तर्फे आकर्षक ट्राफी विजयी संघाला देण्यात येणार आहे. या सामन्यांसाठी प्रवेश फी 999 रुपये आकारण्यात आली आहे. या टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उद्घाटन नुकतेच पार पडले यावेळी ठाणेदार संदीप धोबे, बाजारसमिती सभापती सुरेश चौधरी, गोंडपीपरी यंग ब्रिगेड अध्यक्ष सुरज माडुरवार, शहर विकास आघाडी प्रमुख महेंद्रसिंह चंदेल, नगरसेवक चेतन गौर, पत्रकार समीर निंमगडे यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे A.V.N क्रिकेट क्लब गोंडपिपरी च्या वतीने 100 होतकरू व गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप या सामन्यादरम्यान करण्यात येणार आहे. अशी माहिती A.V.N क्रिकेट क्लब गोंडपिपरी चे अध्यक्ष नितेश डोंगरे, उपाध्यक्ष विनोद लभाने, सचिव अजित कुमार जैन, कोषाध्यक्ष विपिन चौधरी, सहसचिव प्रा.आनंद ढवळे यांच्याकडून मिळाली आहे. या सामन्यांमध्ये अनेक संघाने सहभाग दर्शवावा असे आवाहन A.V.N क्रिकेट क्लब गोंडपिपरी च्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here