विदर्भस्तरीय मेळाव्यांच्या माध्यमांतुन तेली समाजाला एकत्रित करण्यांचा प्रयत्न करु -अजय धाेपटे

0
598

विदर्भस्तरीय मेळाव्यांच्या माध्यमांतुन तेली समाजाला एकत्रित करण्यांचा प्रयत्न करु -अजय धाेपटे

🟣🟡नागपूर🛑किरण घाटे🟢🟢🛑🟣🟩 विदर्भ स्तरीय मेळाव्यांच्या माध्यमांतुन तेली समाजातील भगिनींना एकत्र आणू व हा समाज एकत्रित आणि एकसंघ करु ! त्या द्रूष्टीकाेणांतुन आमचे प्रयत्न सातत्याने सुरु असल्याचे मत
संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा चे संस्थापक व सचिव अजय धोपटे यांनी व्यक्त केले .🟢🟨🟣🟡ते काल मंगळवार दि.२फेब्रुवारीला उपराजधानी नागपूरातील जवाहर विद्यार्थी ग्रूह येथे संताजी ब्रिगेड तेली समाज विदर्भ महिला आघाडीच्या वतीने आयोजित मकरसंक्रात कार्यक्रम , महिला मेळावा व काेराेना याेध्दा गाैरव समारंभ कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन बाेलत हाेते .
🟣🟨🟢🟡🟩समाजातील बंधू-भगिनींना आर्थिक व सामाजिक दृष्टीकोनातून सक्षम व बळकट करण्यास संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा चे प्रयत्न सतत सुरू असल्याची भावना याच कार्यक्रमाच्या निमित्ताने संघटनेचे कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे यांनी या वेळी व्यक्त केली .ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की समाजातील वरिष्ठांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत असुन त्यांचे अमूल्य सहकार्यातुन आमची यशस्वि वाटचाल पुढे सुरु आहे .🟣🟨🛑🟡🟩🌀🟢🟣🛑🟨समाजाच्या सामाजिक उपक्रमात जे काही करणे आपणांस शक्य असेल ते तनमनाने करा ! काही अडचण असल्यास संताजी ब्रिगेड सदैव तुमच्या पाठिशी उभा आहे. अशी सर्वासमक्ष ग्वाही संघटनेचे सह-सचीव हितेश बावनकुळे यांनी आपल्या अल्पशा भाषणातुन या वेळी दिली. 🟣🟨🛑🟡🟨🟢🟣🛑🌀आयोजित या भव्य दिव्य कार्यक्रमात जवाहर विघार्थी ग्रूहाचे अध्यक्ष रमेश गिरडे ,डॉ. स्वाती घोडमारे(MBBS DGO).डॉ. वैशाली गोमासे(MBBS)भूतपूर्व जिल्हा अध्यक्षा निशा सावरकर, उपमहापाैर मनिषा धावडे प्रतिभाताई कुंभलकर,(नगराध्यक्ष नगर परिषद पारशिवनी)करुणा आष्टणकर (नगर अध्यक्षा कन्हान) नंदाताई लाेहबरे (माजी महिला बालकल्याण सभापती) विजय हटवार, समिता चकोले, मंगेश साखरकर, मंगला गंवरे(नगरसेविका)सरीता कावरे (नगरसेविका )वंदना भुरे (नगरसेविका) आदिंनी
आपले विचार या मेळाव्यात व्यक्त केले.🟨🟣🛑🟢🟢🟣🟨🛑🌀प्रतिभा खोब्रागडे, कविता रेवतकर..कु.कल्याणी सरोदे चित्रा माकडे..शोभा जयपुरकर डॉ .स्मिता ढोबळे नर्मदा तडस , सोनाली टिकले, जयश्री गभणे कविता ठाकरे महेंद्र भुरे, रमेश वंजारी,नंदु धोपटे,गोपाल ईटनकर, गजानन तळवेकर ,अमोल साकोरे,नाना भाऊ झोडे, मंगेश कामडी, परेश भनारे,रोहन मोटघरे. सुनिल अवचट.मंगेश वंजारी, प्रमोद उमाटे,कमलेश चकोले, राजेश राजगिरे,प्रमोद कुंजलकर,
आदिंनी कार्यक्रम यशस्वि करण्यांसाठी अथक परिश्रम घेतले. अनेकांनी या कार्यक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली .🟣🟢🟡🛑🟩याच कार्यक्रमात समाजातील अनेक काेराेना याेध्दांचा मान्यवरांच्या उपस्थित सन्मान पत्रे देवून गाैरव करण्यांत आला .🟢🟣🟩🛑🟡पार पडलेल्या या कार्यक्रमाला विदर्भातील समाज बांधव माेठ्या संख्येने उपस्थित हाेते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here