कटाक्ष:लोकशाही नव्हे झुंडशाही, गणतंत्र नव्हे रणतंत्र! जयंत माईणकर

0
483

कटाक्ष:लोकशाही नव्हे झुंडशाही, गणतंत्र नव्हे रणतंत्र! जयंत माईणकर


जेंव्हा श्रीमंत गरीबाचे शोषण करतो, त्याला बिझिनेस म्हणतात.

जेंव्हा त्याच शोषणाविरुध्द गरीब लढतो, त्याला हिंसा म्हणतात.
– मार्क ट्वेन

सहा डिसेंबर १९९२ रोजी ज्या अतिरेकी विचारसरणीच्या संघ समर्थकांनी बाबरी मस्जिदीवर चढून तो ढाचा जमीनदोस्त करत भाजपच्या वाढीची मुहूर्तमेढ रोवली; आज त्याच हिंसक रक्तलांछित विचारसरणीच्या समर्थकांनी लाल किल्ल्यावर चढून शेतकऱ्यांच्या संघटनेचा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला करत आपल्या हातातून निसटणारी सत्ता घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या व्यक्तीने पंजाबी अभिनेता दीप सिद्धू यांनी हा प्रयत्न केला आहे त्या दीप सिद्धूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि गुरुदासपूरचे भाजपचे खासदार सनी देवल यांच्याबरोबरचे फोटो दीप सिद्धूची विचारसरणी उघड करतात.त्यामुळे लाल किल्ल्यावर चढाई करणारा शेतकरी समर्थक नव्हता तर भाजपसमर्थक दीप सिद्धूने उद्युक्त केलेले शेतकरी होते जे आपल्या कृत्याद्वारे संघ परिवाराची सत्तेवरची निसटत चाललेली पकड घट्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते,असा आरोप आहे. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांवर लाठीमार, अश्रूधुर सोडणाऱ्या पोलिसांनी शेतकरी लाल किल्ल्यावर जाऊन ध्व ज लावेपर्यंत बघ्याची भूमिका का घेतली की त्याना गोध्रा दंगलीच्या काळात जसे पोलिसांना तथाकथित रित्या बघ्याची भूमिका घेण्याचे आदेश होते तसेच आदेश होते हाही एक प्रश्नच आहे. एकूणच गांधीहत्येच्या नंतर बाबरी विध्वंस करून आपल्या साठी सत्तेची दारे खुली करणाऱ्या संघ परिवाराने गोध्रा दंगलीनंतर मोदींसाठी आपली सत्तेवरची पकड घट्ट केली. पण सतत दोन महिने चालणाऱ्या शेतकरी आंदोलनामुळे आपली सत्तेवरची पकड ढिली होत आहे याची जाणीव होत असल्यामुळे असेल संघ परिवाराने आपल्या हस्तकांकरवी लाल किल्ल्यावर चढाईचा मार्ग अवलंबत पुन्हा एकदा हिंसेचा मार्ग निवडला आहे.

सुमारे दोन दशकांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचा आपल्या इतर शाखांवर वचक होता, अस मानलं जायचं आणि संघाचा शब्द अंतिम मानला जात होता. पण गुजरातच्या राजकीय क्षितिजावर सात ऑक्टोबर २००१ ला नरेंद्र मोदींचा उदय झाल्यापासून भाजप परिवाराची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक शाखा असून या भाजप परिवाराचे नरेन्द्र मोदी प्रमुख असून अमित शहा हे त्यांचे डेप्युटी आहेत असं चित्र दिसत आहे.

भारतीय संस्कृती मध्ये वडीलधाऱ्या मंडळींचा धाक, वचक घरातल्या सदस्यांवर असतो……इथे घरातले ज्येष्ठच वचकून आहेत कालच्या पोरांना……आणि गोष्टी सनातन भारतीय परंपरेच्या!

एकूण परिवाराच्या कथनी और करनी मे बहुत अंतर है ही परिस्थिती दिसत आहे.

भाजपच्या नेते मंडळींची शेतकाऱ्यांबद्दलची अनास्था दिसून पडते. कंगनाला सुमारे तासभर भेटणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ प्रचारक आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असणाऱ्या भगतसिंग कोशयारी यांना शेतकर्यांना भेटायला वेळ नसावा ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.

आपल्या कुठल्याही कार्यालयात तिरंगा न फडकवता केवळ भगवा ध्वज फडकविणारे किंवा संघाच्या वर्षातल्या पाच सहा महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये स्वातंत्र्य दिन अथवा गणतंत्र दिन यांचा उल्लेख ना करणारे संघ धार्जिणे तथाकथित देशभक्त आता तिरंग्याच्या अपमानाविषयी बोलतात तेव्हा नवल वाटत. अर्थात राम मंदिराच्या नावाने देश ढवळून काढल्यानंतर विकासाच्या गप्पा मारणार्या भाजपच्या मंडळीना हे रंगबदल नविन नाही.
आणि म्हणूनच राम मंदिराची रथयात्रा काढून ३१ वर्षे झाली तरीही राम मंदिराचा पत्ता नाही आणि विकास तर कुठे हरवला आहे की भाजपच्या काळात अस्तित्वातच नव्हता अस म्हणायला हरकत नाही.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना आता जरी भाजपला विरोध करत असली तरीही ही वादग्रस्त विधेयके जेव्हा संसदेत मांडली गेली तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी असलेल्या दोन कुटुंबाशी निगडित असलेल्या या दोन पक्षांनी संसदेच्या दोन सभागृहात विरोधाभासी भूमिका घेतली. शिवसेनेने लोकसभेत विधेयकाच्या बाजूने तर राज्यसभेत विरोधी तर राष्ट्रवादीने लोकसभेत विधेयकाच्या विरुद्ध तर राज्यसभेत चक्क सभात्याग करण्याची भूमिका घेतली.
आज जरी हे दोन्ही पक्ष शेतकर्यांच्या प्रश्नावर एकत्र असले तरीही अशा विरोधाभासी भूमिका घेतल्यामुळे हे पक्ष भाजपला मदत करत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होतो.

काँग्रेस अल्पसंख्याक समाजाचं त्यातही मुस्लिम समाजाचं लांगुलचालन करत आहे असा गोबेल्स पद्धतीने प्रचार करत बाबरी मस्जिद पाडून संघ परिवाराने भाजपला सत्तेवर बसविले. भारतात सुमारे २० कोटी मुस्लिम, पाच कोटी ख्रिश्चन आणि एक कोटी शिख समाजाचे लोक राहतात. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज तर संघ परिवाराच्या पर्यायाने भाजपच्या रडारवर प्रथमपासूनच होते. सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मदर टेरेसा यांच्या सामाजिक कामाच्या मागच्या उद्दिष्टाविषयी शंका उपस्थित करत त्यामागे धर्मपरिवर्तन असल्याचा आरोप केला होता. अर्थात संघाच्या या आरोपात नविन काहीच नाही.
त्यांच्या आधीचे वादग्रस्त सरसंघचालक के सुदर्शन यांनी शिख समाजाला हिंदू धर्माचाच एक पंथ घोषित केला भलेही नंतर परिवाराने शिख हा एक वेगळा धर्म असल्याचं मान्य केलं. आता तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अकाली दलाने भाजपची साथ सोडली आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनात पंजाब, हरियाणातील शिख शेतकऱ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. त्या शिख शेतकऱ्यांना खालिस्तानी अतिरेकी, देशद्रोही म्हणण्यापर्यंत भाजप नेत्यांची मजल गेली. एकूण मुस्लिम, ख्रिश्चन या अल्पसंख्याक समाजाच्या पाठोपाठ शिख समाजाला सुद्धा अतिरेकी, देशद्रोही हे लेबल लावायला हिंदुत्ववादी संघटनेने मागेपुढे पाहिले नाही. या शिख समाजाचं भारतीय लष्करी आणि निमलष्करी दलातील वर्चस्व वादातीत आहे. जय जवान जय किसान या उक्तीप्रमाणे लष्कर आणि शेती या दोन्ही क्षेत्रात स्वतः च वेगळं अस्तित्व ठेवणाऱ्या या अल्पसंख्याक समाजाला सुद्धा संघाने टारगेट केलं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. एकाच वेळी तिन अल्पसंख्याक समाजात विखुरलेल्या सुमारे २५ कोटी भारतीयांना टारगेट करून संघाला केवळ त्यांना अभिप्रेत असलेलं हिंदू राष्ट्र तयार करायच आहे का? ही मनुस्मृतीची अंमलबजावणी करण्याची सुरुवात म्हणावी लागेल. प्रथम अल्पसंख्याक समाजाला आणि त्यापाठोपाठ शेतकऱ्यांना रस्त्यावर यायला लावणाऱ्या संघ परिवाराचा अर्थातच भाजपचा खरा चेहरा ओळखा ही अपेक्षा! तूर्तास इतकेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here