चिमूर तहसील कार्यालयात खाजगी व्यक्तींचा वाढताेयं धुडगुस !

0
631

चिमूर तहसील कार्यालयात
खाजगी व्यक्तींचा वाढताेयं धुडगुस !
नागरिकांना होताे नाहक त्रास !
“त्या” वावरणां-या व्यक्तींचा त्वरीत बंदोबस्त करा ! विलास मेहरकुरे यांनी केली मागणी !

🟣🟩चिमूर 🟨🟣किरण घाटे🟣🌀🛑

चिमूर तहसील कार्यालयात प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या जवळ एक खाजगी कर्मचारी राहत असल्याने ते मात्र आर्थिक व्यवहार किंवा चिरीमिरी घेतल्याशिवाय नागरिकांचे कागद समोर करीत नसून ते काम करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने खाजगी कर्मचारी असलेल्या त्या सर्व कर्मचाऱ्यांचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी विलास मेहरकुरे यांनी केली आहे.🟩🟣☀️🌀वास्तविक बघता अश्या महत्वाच्या टेबलवर अश्या खासगी व्यक्तींना ठेवणे ही बाब याेग्य नसल्याचे मेहरकुरे यांनी म्हटले आहे .

🟣🟡🟩☀️🟪.दरम्यान चिमूर तहसील कार्यालय मध्ये फेरफार विभाग, खनिज विभाग, अन्न धान्य विभाग मधील टेबल वर अनेक खाजगी कर्मचारी म्हणून काम करीत आहे.🌀🟣🟢☀️🟩 परंतु तालुक्यातील नागरिक आपले कामे करण्यासाठी येत असताना त्यांचे कामे मात्र वेळेच्या आत (कामे )पूर्ण होत नाही आर्थिक व्यवहार किंवा चिरीमिरी न दिसल्यास ते सर्व्हर बंद आहे किंवा इतर काही कारणे सांगून ते टाळाटाळ करीत असतात. त्यामुळे साहजिकच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे
🛑🟩🟣 🌀🟪☀️🟩🟡 या विभागाचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी त्वरीत दखल घेऊन सरकारी लिपिक जवळील त्या सर्व खाजगी असलेल्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी विलास मेहरकुरे यांनी केलेली आहे.🟣🌀☀️🟨🟪🟩चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी या बाबीकडे तातडीने लक्ष पुरवावे अशी मागणी ग्रामीण भागातील जनता आता करीत असल्याचे एकंदरीत दिसून येते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here