अमित महाजनवार राजुरा भूषण पुरस्काराणे सन्मानित

0
668

अमित महाजनवार राजुरा भूषण पुरस्काराणे सन्मानित

काही व्यक्तींना समाजाबद्दल खूप आपुलकी असते.समाजातील दुःख त्यांना लवकर टिपता येते.त्यामुळे आपल्या हातून नेहमी समाजासाठी काहीतरी चांगले घडावे या दृष्टीकोनातुन आपल्या जीवनातील आनंदाचे दिवस ते समाजासोबत साजरे करत असतात. अशाच व्यक्तिमत्वापैकी एक म्हणजे राजुराचे विस्तारअधिकारी अमित महाजनवार.त्यांनी स्वतःच्या वाढदिवनिमित्य होणारा अनावश्यक खर्च टाळून कुपोषितांना पोषण आहाराची अनोखी भेट दिली.आणि समाजपरिवर्तनाची सुरवात झाली. अमित महाजनवार यांच्या संकल्पनेतुन उदयास आलेल्या ‘बाळु’ संस्तेच्या माध्यमातून ज्यांचा वाढदिवस असायचा किव्हा कुठलाही कार्यक्रम असला की सामाजिक भावनेतून कुपोषितांना मदतिचा हात द्या हे आवाहन अमित महाजनवार व संस्थे च्या पधाधिकाऱ्यांकडून करण्यात आले व एक चळवळ निर्माण झाली 500 च्या जवळपास कुपोषित बालकांना पोषण आहार देण्यात आले. राजुरा,गडचांदूर,कोरपना,जिवती,गोंडपीपरी,बलारशाहा सह जिल्यातील अनेक ठिकाणी कुपोषितांना पोषण आहाराचे साहित्य भेट देत बालगोपालांना दिर्घायुषी होण्यासाठी नवसंजीवनी बाळू संस्थे च्या माध्यमातूंन देण्यात आली २६-०१-२०२१ रोजी गणतंत्र दिवसा निमित्ताने उपस्थित राजुरा शहराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, व राजुरा विधानसभा आमदार सुभाश धोटे यांच्या हस्ते राजुरा नगरपरिषद तर्फे बाळू चे स्वथापक अमितजी महाजनवार विस्तार अधिकारी पं. स. राजुरा यांना ‘बाळू’ कुपोषन मुक्त भारत या कार्यासाठी राजुरा भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.
या वेळी उपस्थित राजुरा नगर परिषद चे उपाध्यक्ष सुनील देशपांडे, मुख्यधीकारी विजयकुमार सरनाईक, व राजुरा नगर परिषद चे मान्यवर सुद्धा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here