राजनगट्टा येथे राष्ट्रीय मतदार दिन संपन्न

0
336

राजनगट्टा येथे राष्ट्रीय मतदार दिन संपन्न

सुखसागर झाडे

नेहरु युवा केंद्र, गडचिरोली अंतर्गत छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगट्टा व वीर मराठा युवा मंडळ कुंभारवाही च्या वतीने राजनगट्टा येथे 11 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करून नवीन मतदारांचे सत्कार करण्यात आले व त्यांना मतदानाचे मूल्य सांगून जागृत करण्यात आले. त्याच प्रमाणे येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे ओचित्य सादत गावातून सायकल रॅली काढून स्वच्छतेप्रती जनजागृती देखील करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक दादाजी कोहळे, तुकाराम भांडेकर, प्रकाश चीचघरे, लोमेश सातपुते, वसंत कोहळे , मंडळाचे अध्यक्ष उमेश भांडेकर, सचिव अनुप कोहळे, NYK तालुका समन्वयक पवन आभारे त्याच प्रमाणे राजनगट्टा व कुंभारवाही येथील गावातील युवक ,युवती व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू सोमनकर तर आभार उमेश भांडेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगट्टा व वीर मराठा युवा मंडळ कुंभरवाही च्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here