भीतीच्या सावटाखाली वावरतेयं अख्खं गाव ! 

0
1385

भीतीच्या सावटाखाली वावरतेयं अख्खं गाव  ☀️

पोलिसांचा पहारा गावं जागे तरी घरांना लागतेय आग 🔥

🟪🟥🟢🟡किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर🛑🟢एक दाेन घरांना नव्हे तर तब्बल १५पेक्षा अधिक घरांना अकस्मिकरित्या आग लागल्याच्या घटना सातत्याने घडल्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील नवेगांव लाेन गावातील वास्तव करणारे संपूर्ण कुंटुब भीतीच्या सावटाखाली वावरतेयं असल्याचे चित्र शनिवार दि.२३जानेवारीला प्रत्यक्षात या गावला भेंट दिली असता दिसुन आले .🟥🟡🌀दरम्यान यातील अचानक पणे घरांना , काेठ्यांना , शेतातील असणां-या तणसीच्या ढिगांना सातत्याने लागणा-या आगींचे कारण अद्याप उजेडात आले नसले तरी गावातील मंडळी सदैव आनंदाने जीवन कंठीत असतांना आता मात्र या प्रकारांमुळे त्यांचेत दहशत पसरली असल्याचे चित्र या वेळी द्रुष्टीक्षेपात पडले .🟢🟨🌼🟪दि.४जानेवारी च्या सायंकाळपासून या आगींच्या घटनांना सुरुवात झाली ती आजपावेताे सुरु असल्याचे गावचे पाेलिस पाटील दिलीप दादाजी काेठेवार यांनी या प्रतिनिधीला शनिवारी सांगितले .🟢💠🟥🟨🟡दरम्यान त्यांनी आपले कर्तव्य पार पाडत असतांनाच संपूर्ण घडत असलेल्या प्रकाराची माहिती तातडीने सिंदेवाही तहसीलदार व पाेलिस स्टेशन सिंदेवाही यांना दिली असल्याचे या भेटीच्या वेळी सांगितले .🟨☀️🟣🛑🟪पंधरा ते विस दिवसांचा कालावधी लाेटुन गेला आहे प्रशासनाच्या वतीने ठाणेदार योगेश घारे यांनी या गावाला भेंट देवून गावक-यांचे या घटने बाबत म्हणने ऐकुन घेतले 🟪💠🌀🟢 परंतु महसुल विभागाच्या काेणत्याही वरिष्ठ अधिका-यांनी किंवा कर्मचा-यांनी अद्याप या गावाला शनिवार पर्यंत भेंट दिली नसल्याचे गावक-यांनी सांगितले . 🟢🟡🛑🌼🌀🟥नवेगांव लाेन या गावची लाेकसंख्या ग्राम पंचायतच्या रेकाँर्ड नुसार ९७३असुन या सततच्या घटनामुळे येथील नागरिकांत अंधश्रध्देच्या चर्चेला उत येत अाहे .🟣🟨🔷🟧🔶सदरहु गावातील ही परिस्थिती बघता सिंदेवाही येथील अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संघटक ठेकेश्वर पर्वते यांनी ही आग मानव निर्मित असल्याची शक्यता असल्याचे सांगितले असे तेथील नागरिक या वेळी सांगत.🔶🟪🛑🟢🌀🟧सततच्या घटनामुळे गावमंडळीत अंधश्रध्दे बाबत गैरसमजुत निर्माण झाली आहे .तंत्र मंत्राने ही आग लावता येत नसल्याचे तेथील जनतेला त्यांनी पटवुन दिले आहे .केमीकल माध्यमांतुन ही आग कुणीतरी लावत असेल याची शक्यता नाकारता येत नाही असे ते म्हणाल्याचे गावक-यांनी सांगितले .🟡🔷🟥🟩🌼💠नेमका या आगीचा प्रकार काय ?या बाबत अद्याप उलगडा झाला नसला तरी या गावात सिंदेवाही पाेलिस स्टेशनचे पाेलिस दिवस रात्र पहारा देत आहे .बच्चा कंपनीसह वयाेव्रूध्द मंडळीच्या मनात आज ही या आगीची भीती कायम आहे .हे मात्र तेवढेच खरे आहे .🛑🔶🟢🟪🟨🟣कुणी तरी गावातील या अकस्माक आगीचे प्रकार बंद करुन गावकरी मंडळींना कायमचा दिलासा द्यावा असे सुर या वेळी प्रत्येकांचे बाेलण्यांतुन उमटले .नेमके घटने चे कारण शाेधणे हे एक प्रकारचे आव्हानच असुन या बाबतीत प्रशासन आपल्या स्तरांवरुन नेमकी काय भूमिका घेतात या कडे सा-यांचे लक्ष वेधले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here