उमरखेडच्या घटनेमुळे महसुल विभागात भीतीचे वातावरण

0
557

उमरखेडच्या घटनेमुळे महसुल विभागात भीतीचे वातावरण

नायब तहसीलदार व पटवा-यावर रेती तस्करांनी चालविला चाकू

चंद्रपूर । किरण घाटे

उमरखेड -ढाणकी मार्गावर गेल्या दाेन दिवसापुर्वि उमरखेडचे नायब तहसीलदार तथा तेथील एका पटवा-यावर रेती तस्करांनी चाकू हल्ला केल्याची घटना घडली .या घटनेमुळे संपूर्ण महसुल विभागात खळबळ उडाली असुन अधिकारी व कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे एकंदरीत दिसते.
सदरहु घटनेतील नायब तहसीलदार गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यांत आले तर याच घटनेत पटवारी जखमी झाल्याचे खात्रीलायक व्रूत्त आहे.
अलिकडे अश्या घटना माेठ्या प्रमाणात घडत असुन महसुल विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी जिवाची पर्वा न करता रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यांस कंबर कसली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here