गाैण खनिज प्रकरणात बल्लारपूर महसुल विभागाची ६६९३८४४ रुपये वसुली

0
403

गाैण खनिज प्रकरणात बल्लारपूर महसुल विभागाची ६६९३८४४ रुपये वसुली

२१ अवैध रेती वाहनांवर कारवायां!

किरण घाटे

बल्लारपूर (चंद्रपूर) । चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक परिसर म्हणुन आैेळखल्या जाणां-या बल्हारपूर महसुल विभागाने माहे एफिल २०२० ते माहे डिसेंबर २०२० या कालावधीत एकंदर गाैण खनिज प्रकरणात एकंदर ६६९३८४४ वसुली करुन ती खजीना दाखल केल्याचे समजते . या वसुली प्रकरणात तात्पुरता वसुली परवाना , अवैध गाैण खनिज उत्खनन व वाहतुक व्दारे झालेली वसुली , ग्राम पंचायत, रायल्टी खनिकर्म अधिकारी चंद्रपूर व्दारे या तालुक्यात दिलेल्या परवानाव्दारे झालेली वसुली व अन्य वसुलीचा समावेश आहे.
दरम्यान याच कालावधीत महसुल विभागाच्या महसुल पथकाने उपविभागीय अधिकारी संजय डवरे, तत्कालीन तहसीलदार पाेहनकर व विद्यमान तहसीलदार संजय राईंचवार , याच विभागाचे नायब तहसीलदार रमेश कुळसंगे यांचे मार्गदर्शनाखाली तब्बल २१अवैध रेती वाहन प्रकरणात धडक कारवायां केल्या आहे. बल्हारपूर तहसील मध्ये एकुण पाच रेती घाट येत असुन अद्याप एक ही रेती घाटाचा लिलाव झाला नाही हे विशेष !
महसुल विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अवैध रेती वाहतुक प्रकरणात सातत्याने धडक कारवाया केल्यामुळे काही अंशी या तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर अंकुश बसला हे मात्र तेवढेच खरे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here