चंद्रपूरात शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने ! अनेक कर्मचारी संघटना सहभागी !

0
565

चंद्रपूरात शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने ! अनेक कर्मचारी संघटना सहभागी !
🟣🟩☀️चंद्रपूर🌼🟣💠💠🟩किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी🟣
दिल्ली येथे आंदोलानाच्या रणसंग्रामात उतरलेल्या देशभरातील शेतक-यांना पाठींबा देण्यांच्या उदात्त हेतूने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आज गुरुवार दिनांक 21 जानेवारी 2021 रोजी दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोर जोरदार निदर्शने करुन अखिल भारतीय एकजुट दिन साजरा करण्यात आला. 🌼🌀💠🟩त्या अनुषंगाने ना. नरेंद्रजी मोदी, पंतप्रधान, भारत सरकार, (नवी दिल्ली )यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.

🟪🟢🔶🟣☀️सध्या दिल्लीच्या सिमेवरील या संघर्शास 2 महिन्याचा प्रदिर्घ कालावधी होत असून शेतकरी नेत्यांसह केंद्र सरकारच्या वतीने चर्चेच्या 9 फे-यांमध्ये कोणतीही तजजोड होत नाही म्हणजेच केंद्र सरकार कडून शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी समाधानकारक ठोस भुमिका अद्याप अदा झालेली नाही हे स्पष्ट दिसून येते. ☀️🟣🟢🟡🌼पाऊस थंडी वा-यात हजारो शेतकरी स्त्री-पुरुश आपल्या जीवाची बाजी लावून लढत आहेत. हे चित्र विदारक आहे. 🌀🟣🟩🛑💠🌼🟪☀️🌼त्यामुळे या समस्याग्रस्त शेतकरी बांधवांना इतर समाज घटकांनी, सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने, सश्रध्द पाठींबा व्यक्त करुन, भरभक्कम एकजुटीचे दर्शन गरजेचे होते. त्याअनुषंगाने अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार या शेतकरी बांधवांप्रती सरकारी कर्मचा-यांची बांधीलकी दर्श विण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने गुरुवार दि. 21 जानेवारी 2021 रोजी दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन शेतकरी विरोधातील जुलमी कायदे रद्दबातल करण्यासाठी देशभरातील बळीराजांचे दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या संघर्षाला पाठींबा व्यक्त करण्यात आला.

🌀🟣🟪🟡🟢🌼💠राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस रमेश पिंपळशेंडे व अध्यक्ष दिपक जेऊरकर यांनी आपल्या मनोगतातून 3 कृषी कायदे व शेतक-यांच्या परिस्थिती विषयी आपले विचार व्यक्त केले .

🌀🟣☀️🟡🟢 या निदर्शने कार्यक्रमास महसुल विभाग, बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, कोषागार कार्यालय, वन विभाग, वस्तु व सेवा कर विभाग, भुमि अभिलेख विभाग, कृषी विभाग, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कर्मचारी, अभियांत्रिकी महाविद्यालय, भुविज्ञान-खनिकर्म विभाग, हिवताप कर्मचारी, आरोग्य विभाग आदि विभागाचे कर्मचारी तसेच दिपक जेऊरकर, रमेश पिंपळ शेंडे, राजु धांडे, राजेश पिंपळकर, एस. आर. मानुसमारे, गणेश मानकर, महेश पानसे, अतुल भिसे, शैलेंद्र धात्रक, चंद्रकांत कोतपल्लीवार, राजेश पचारे, रविंद्र आमवार, अजय चहारे, श्रीकांत येवले, नितीन पाटील, अनंत गहुकर, अविनाश बोरगमवार, प्रितम शुक्ला, संदीप गणफाडे या शिवाय विविध कार्यालयीन संघटनांनी या निदर्शने कार्यक्रमात आपला सहभाग दर्शविला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here