आपचे चंद्रपूरात खड्डे बुजवा आंदोलन ! जनता आंदाेलनात सहभागी !

0
567

आपचे चंद्रपूरात खड्डे बुजवा आंदोलन ! जनता आंदाेलनात सहभागी !

🟡🟩🌀🟣चंद्रपूर☀️किरण घाटे🌀🟢🟣💠
आज बुधवार दि. 20 जानेवारी 2021 ला स्थानिक पंचशील चौक परिसरातील एका ज्वलंत विषयाला घेऊन आम आदमी पार्टीने चंद्रपूरात धरणे आंदोलन केले. 🟡💠🌀🟣शहरातील स्थानिक पंचशील चौकांमध्ये वाहत असलेल्या एका नाल्यावर पुल आहे .त्याला फार मोठे भगदाड पडले असल्याचे प्रत्यक्षात दिसते.तदवतच मागच्या दोन तीन महिण्यांपासून त्या ठिकाणी पाच ते सहा अपघातांच्या घटना घडल्या आहे.या परिसरातील नागरिकांची आम आदमी पार्टी कडे या संदर्भात एक तक्रार देखिल दाखल केली त्याच मुद्द्याच्या अनुषंगाने आज धरणा आंदोलन करण्यांत आले. 💠🟡🟣🌀💠सदरहु गजबजलेल्या दाट वस्तीत त्या खड्ड्यामुळे भविष्यात अपघात घडणार नाही याची दक्षता शहर मनपा प्रशासनाने घेवून प्राणहानी टाळावी अशी मागणी सुध्दा लेखी स्वरुपात आपने केली आहे .🟡🟧☀️🌀आम आदमी पार्टीच्या आज झालेल्या या धरणे आंदोलनात प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुनील देवराव मुसळे शहर अध्यक्ष प्रशांत प्रभाकर येरने भिवराज भवरलालजी सोनी , सुनील रत्नाकर भोयर, हुमायु अली , सिकंदर सागोरे , दिलीप भाऊ तेलंग , अशोक भाऊ आनंदे , राजु कुडे ,योगेश आपटे, मनोज मिश्रा व संबंधित वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🟪🟩🟡🌼🟡💠येत्या दोन दिवसांत जर हा खड्डा दुरूस्त झाला नाही तर त्यानंतर अधिक तीव्र आंदोलन करण्यांचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे . 💠☀️🟣🌀🟢महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराचा भंडाफोड करण्यासाठी सर्व सामान्य जनता आता रस्त्यावर उतरु लागली आहे . 🟪🟧🟡🟨🌀सुरक्षेचा प्रश्न वीज पाणी , शिक्षण ,आराेग्य ,रोजगार, या सर्व ज्वलंत विषयावर आप या पुढे हात लावणार असल्याचे एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here