चंद्रपूर नगरीतील शेकडो युवकांचा यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटनेत प्रवेश !

0
425

चंद्रपूर नगरीतील शेकडो युवकांचा यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटनेत प्रवेश !

चंद्रपूर 🟪🟨🔶किरण घाटे🟩🟨

विदर्भात सामाजिक कार्यात सदैव अगक्रमी असणां-या चंद्रपूर शहरातील यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक ,अध्यक्ष, तदवतचं चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शहरातील शेकडों युवकांनी काल स्वयंस्फुर्तिने (साेमवारी) यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश केला. 🟪🟨🟣💠यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांना यंग चांदा ब्रिगेडचा दुप्पटा टाकून त्यांचे स्वागत केले. 🟪🟧☀️🟡🟢यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सलीम शेख, घुग्घूस शहर संघटक विलास वनकर, राशिद हुशैन, करणसिंह बैस, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांची या वेळी उपस्थिती होती.
🟢🟨🟣🟪यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमांतून विविध क्षेत्रात सदैव सामाजिक कार्य केल्या जात असुन सामाजिक उपक्रमाच्या बाबतीत ही संघटना नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे .प्राणघातक कोरोना काळात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राबविण्यात आलेले उपक्रम विशेष उल्लेखनिय ठरले आहेत दरम्यान काल शहरातील विविध प्रभागातील युवकांनी शेकडोंच्या संख्येने यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश केला.🟣🟧🟨🟢🟪 यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात काल एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेश करणां-या युवकांमध्ये प्रामुख्यांने राष्ट्रवादी नगर, पंचशील चौक, रयतवारी, लालपेठ, नेहरु नगर, समाधी वार्ड, बाबूपेठ, भिवापूर, महाकाली मंदिर या वार्डांसह इतर वार्डातील युवकांचा समावेश आहे. याच कार्यक्रमाच्या वेळी वार्ड अध्यक्षांच्या नियुक्त्यांही करण्यात आल्यात. यामध्ये तिरुपती कलगुरवार यांना रयतवारी वार्ड अध्यक्ष, दिनेश इंगळे यांना राष्ट्रवादी नगर वार्ड अध्यक्ष, रवि करमळकर यांना पंचशील चौक वार्ड अध्यक्ष, राम जंगम यांना लालपेठ वार्ड अध्यक्ष, दिनेश बोढाले यांना नेहरु नगर वार्ड अध्यक्ष, भुषण पोतीवाल यांना समाधी वार्ड अध्यक्ष, क्रीष्णा कामपेल्ली यांना लालपेठ ३ नंबर वार्ड अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. 🟩💠🟨🟢🟣यंग चांदा ब्रिगेड ही सामाजिक संस्था असून समाजकार्यात युवकांचे सहकार्य असले पाहिजे. संस्थेचे ध्येय, धोरण आणि संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाचा लाभ शेवटच्या गरजू पर्यंत पोहचविण्याचे काम सामाजिक क्षेत्राची आवड असल्याने यंग चांदा ब्रिगेडशी जुळलेल्या नव्या सदस्यांच्या माध्यमातून झाले पाहिजे असे आवाहन यावेळी बोलतांना आमदार जोरगेवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here