चैतन्य कॉलनी येथे रक्तदान शिबीर संपन्न

0
463

रक्तदान हे श्रेष्ठदान : डॉ. पद्माकर सोमवंशी

 

प्रतिनिधी /देवेंद्र भोंडे

अमरावती : रक्तदान हे सर्व दानातील श्रेष्ठदान आहे. एकाद्याचा जीव वाचविण्यासाठी मानवाचे रक्त हे खूप महत्वपूर्ण ठरणारे असते. यासाठी प्रत्येकाने सामाजिक ऋुणाची जाण ठेवून नियमितपणे रक्तदान करुन सामाजिक कर्तव्य पार पाडावे, असे प्रतिपादन डॉ. पंजावराब देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी केले. चैतन्य कॉलनी येथे युवा दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

युवा दिनाचे औचित्य साधुन चैतन्य व्हॉलीबॉल क्लबतर्फे रविवार, दि.17 जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबीराचे आयोजन स्वराज्य इंजिनिअर्सचे अध्यक्ष गौरव खोंड यांच्या नेतृत्वात तर डॉ. श्याम सोमवंशी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. डॉ. पदमाकर सोमवंशी यांचे स्वागत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन बोंद्रे यांच्या हस्ते झाले तसेच पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय चमूचे स्वागत अमित वानखडे,श्री. बागडे, श्री.महालक्ष्मे, श्री. कावतकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबीराला चैतन्य कॉलनीतील माजी नगरसेवक अविनाश मार्डीकर, मुंगसाजी महाराज संस्थेचे अध्यक्ष मिलिंद मानकर व अमित भुयार तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. अंबादास यादव, प्रा.किशोर तायडे, विशाल काळे, समीर काळमेघ, आकाश इंगोले, आकाश बंगाळे, निलेश देशमुख, प्रणित काळे, अनिकेत वानखडे, प्रणित बकाले, अश्विन गौरखेडे, श्री.पवार, सागर गौरखेडे, , मनोज देशमुख, सागर वनवे, तिलक देशमुख, उज्वल ठाकरे, प्रमोद तरोडे, अविनाश तायडे, निषद उमप, श्रीकांत सोनटक्के, राहुल उरकुडे, श्रीमती उज्वला श्याम सोमवंशी, श्रीमती रजनी जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होवुन रक्तदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here