बिबी येथे बचत गटांचा महिला आनंद महोत्सव जल्लोषात

0
461

बिबी येथे बचत गटांचा महिला आनंद महोत्सव जल्लोषात

सावित्रीबाई फुले महिला बचत गटाचे आयोजन : हळदीकुंकू, फॅशन शो, उखाणे, नृत्य स्पर्धाने रंगत

गडचांदूर :

सावित्रीबाई फुले जयंती व मकरसंक्रांतीच्या निमित्ताने बिबी येथे बचत गट महिलांचा महिला आनंदोत्सव २०२१ महोत्सव जल्लोषात पार पडला. सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेत बचत गटांना मार्गदर्शन व विविध स्पर्धेतून कला गुणांना वाव देत व्यासपीठ मिळवून दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सदस्य सविता गिरीधर काळे तर अतिथी म्हणून गटाच्या अध्यक्ष सुनिता संतोष पावडे, सचिव सखू अनंता खोके, निर्मला भास्कर गिरटकर, कुंदा चंद्रशेखर चटप, अल्का रविंद्र पिंगे, लता शंकर आस्वले, सुनिता विकास अंदनकर, चंद्रकला तानबा क्षिरसागर, माया महादेव घुगूल, इंदू पुरुषोत्तम काळे, मिरा गणपत बोबडे उपस्थित होते. यावेळी कृषी सहायक रेणूका उद्गीरे, उमेदच्या तालुका व्यवस्थापक अर्चना बोनसुले यांनी बचत गट महिलांना सक्षमीकरणासाठी लघुउद्योगाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या संयोजिका स्नेहल संतोष उपरे यांनी महिलांच्या कला गुणांना वाव मिळणे व बचत गट सक्षम होवून आगामी काळात लघुउद्योग सुरु होणे गरजेचे आहे, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भुमिका मांडली.

एक दिवसीय महिला आनंदोत्सवात सामुहिक हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला. महिलांच्या आनंदासाठी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम सुलोचना महादेव लालसरे, द्वितीय कमला नामदेव ढवस, तृतीय माया भाऊराव अहिरकर यांनी क्रमांक पटकावले. फॅशन शो स्पर्धेत प्रथम आकांक्षा सुधीर टोंगे, द्वितीय रोशनी सचिन आस्वले, तृतीय प्रिती अमोल घुगूल यांनी बाजी मारली. समुह नृत्य स्पर्धेत वुमन इंपावरमेंट गृपच्या श्र्वेता आस्वले, अश्वीनी सोनूले, योगिनी आडकिने, हर्षाली आडकीने, धनश्री भोयर यांनी प्रथम तर द्वितीय पारितोषिक सेवार्थ गृपच्या प्रिती घुगूल, वंदना मुसळे, जयश्री पावडे, नेहा चौके यांनी व तृतीय पारितोषिक दुर्गा गृपच्या उषा उपरे, प्रिया आत्राम, सुनिता सुर्यगंध, पल्लवी सातघरे यांनी पटकावले. प्रोत्साहन पारितोषिक कविता कुमरे, सविता मडावी, मालती मेश्राम, सुगंधा मेश्राम, स्वाती मट्टे, पोर्णिमा उइके, सुमन भगत, उषा पानघाटे, शारदा मोहजे, छाया सोनटक्के, सुनंदा मरस्कोल्हे, जोगवा गृपच्या सुवर्णा विरुटकर, सोनू विरूटकर, दिपाली मेश्राम, पुजा घुगूल, स्मिता आवळे यांना देण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण अरुणा बुचे, मिरा उजळे, अरुणा चव्हाण यांनी केले. संचालन साक्षी पाचभाई, केशरी गिरटकर, तेजस्वीनी बुचे तर आभार चंद्रकला क्षिरसागर, निर्मला गिरटकर यांनी मानले.

••••••••

महोत्सवाने बचत गट महिला एकवटल्या

गावात पहिल्यांदाच बचत गट महिलांचा आनंद महोत्सव सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने घेतला. यात साधारणता गावातील पाचशे ते आठशे महिलांची उपस्थिती होती. बचत गट सक्षमीकरणासाठी या आनंद महोत्सवात सविस्तर चर्चा झाली. लघुउद्योग उभारुन आर्थिक समृद्धी साधण्याचे बचत गट महिलांनी ठरवले. उमेद च्या तालुका व्यवस्थापक अर्चना बोनसुले यांनी महिलांना लघुउद्योगाचे धडे दिले. गावात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात गावातील बचत गटाच्या महिला एकत्र येत कलागुणांचा आविष्कार घडवला, हे विशेष.

••••••••••

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here