संघारामगिरीत होणार धम्मतत्वांवर विचारमंथन

0
411

संघारामगिरीत होणार धम्मतत्वांवर विचारमंथन

30 व 31 जानेवारीला द्विदिवशीय धम्म संभारंभ

विविध कार्यक्रमाचें आयोजन

तालुका प्रतिनिधी
चिमूर

चिमूर वरोरा राज्य माहामार्गावरील गुजगव्हांन येथून पूर्व दिशेने 5 किमी अंतरावर असलेल्या तपोवन बुद्ध विहार, महाप्रज्ञा, साधनाभूमी, संघारामगिरी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य धम्म संमारंभ दिनांक 30 व 31 जानेवारीला आयोजित करण्यात आलेला आहे.
मागील दहा महिन्यापासून देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रसारित होत असून, राज्यातील अनेक दुकान, नाट्यगृह, मंदिर, देवालये, सर्व पूर्णता बंद करण्यात आले होते. मागील दोन ते तीन महिन्यापासून हळूहळू प्रत्येक गोष्टी शिथिल करण्यात आले. यात मागील पंधरा दिवसाअगोदर राज्यातील यात्रा, सण उत्सव, व नाट्यगृह सुरु करण्याबाबद्द पत्र राज्याच्या मंत्रिमंडळातून झळकले अन भाविक भक्तांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. यामुळं अनेक बौद्ध अनुयायांना चिंता वाटली की यावर्षी संघारामगिरी येथील धम्म संभारंभ कार्यक्रमात खंड पडते की काय? अशी चिंता बौद्ध अनुयायांना होती. मात्र शासनाने आदेश देऊन यात्रा, सण उत्सव व नाट्यगृह खुले केलीत. यामुळेच संघारामगिरी येथील धम्म संभारभ कार्यक्रमात खंड न पडता यावर्षी सुद्धा संघारामगिरी येथे द्विदिवशीय भव्य धम्म संभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
पिढ्यानपिढ्या डोळे असून आंधळा असलेला. कान असून बहिरा असणारा. तोंड असून मुका असणारा. समाज, बोधिसत्व परमपूज्य डाँ. बाबासाहेब आंबेडकराच्या मुकनायकी आंदोलनामुळं खळबडून जागा झाला. आणि पिढ्यांपिढ्याची गुलामी संपली. 31 जानेवारी 1920 ला मूकनायक हे मुखपत्र काढून मुक्तीचा संग्राम लढविला. यामुळेच तपोवन बुद्ध विहार संघारामगिरी येथे मागील अनेक वर्षांपासून द्विदिवशीय 30 व 31 जानेवारीला भव्य धम्म संभारभ कार्यक्रम आयोजित केला जातोय.
कार्यक्रमाच्या संमारभाचे अध्यक्ष पूज्य भदंत शिलानंद महस्थविर, तपोभूमी आंबोडा (वर्धा) हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय भिक्षु संघ, भारत, तर या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून विजय वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर, व बहुजन मंत्री महाराष्ट्र राज्य, संजय राठोड वनमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रा. जोगेंद्र कवाडे माजी खासदार, डाँ. कमलाताई गवई लेडी गव्हर्नर, राम मेश्राम अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, प्रा. रवी कांबळे, नितीन राऊत ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य, किर्तीकुमार भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र, सतीश वारजूरकर माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, सुलेखाताई कुंभारे अल्पसंख्याक आयोग सदस्य दिल्ली, इंजिनियर विजय मेश्राम सेवानिवृत्त सचिव भारतीय रेल्वे, बाळूभाऊ धानोरकर खासदार ईत्यादी पाहुणे मंडळी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, सकाळी 10 वाजता ध्वजारोहण व मानवंदना समता सैनिकद्वारे होणार आहे. 10:30 ला शिलग्रहन, 11 वाजता भिखू संघाचे भोजनदान, दुपारी 1 ते 4 वाजता वेगवेगळ्या विषयांवर प्रवचन होणार आहे. सायंकाळी 4 ते 6 वाजता बुद्ध व भिमगीते 6 ते 8 वाजता सामाजिक परिवर्तनाची चळवळ यावर पथनाट्य, रात्री 10 ते 2 वाजता महापरित्रांण पाठ होणार आहे. दुसऱ्या दिवशी 31 जानेवारी ला पहाटे 5 ते 6:30 पर्यँत ध्यान साधना व मंगलमैत्री, सकाळी 9:11 वाजता प्रवचन सकाळी 11 वाजता भोजनदान व भिखू संघास चिवर अष्टपरिषकार दान, दुपारी 1 ते 3 पर्यँत डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत चळवळ, समता सैनिक दल, बौद्ध स्तूपाचे महत्व यावर चर्चासत्र, दुपारी 3 वाजता अध्यक्षांचे प्रवचन, दुपारी 4 वाजता मंगलमैत्री व समारोह कार्यक्रम होणार असून, कार्यक्रमाचे संचालन भिक्खू ज्ञानज्योती, महास्थविर, ताडोबा अभयारण्य, संघनायक संघारामगिरी हे करणार आहेत. तर कार्यक्रमाचे आयोजक उपासक – उपासिका संघ महाराष्ट्र हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here