_अमरावती येथील कोविड सेंटरच्या “नर्स ” चे जेवणाचे हाल ; राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे महिला डॉक्टरांनी केली तक्रार_

0
324

देवेंद्र भोंडे

अमरावती -: अमरावती येथील पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथील कोवड सेंटरमध्ये ज्या महिला नर्स आपले कर्तव्य बजावीत आहे. त्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने त्यांनी आज राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यांना जेवणाचे डबे दाखवून आपली व्यथा मांडली, त्यांना जेवणामध्ये भाजीत अळ्या आढळल्याचे तक्रार सुद्धा त्या महिलांनी केली सोबतच त्यांना गेल्या तीन महिन्यापासून चे मानधन मिळाले नाही त्यामुळे त्या आर्थिक अडचणीत येत आहे, तेव्हा बच्चू कडू यांनी त्यांची तक्रार समजून घेतली व जिल्हाधिकार्‍यांना त्यांना चांगले जेवण पुरविण्याचे आदेश दिले, व सोबतच आठ दिवसांमध्ये जर यांचे मानधन मिळाले नाही तर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय यांच्यावर गुन्हे दाखल करू असेही यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले…_

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here