उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त ठरलेल्या विशाल शेंडेवर हाेताेयं सर्वत्र अभिनंदनांचा वर्षाव !

0
566

उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त ठरलेल्या विशाल शेंडेवर हाेताेयं सर्वत्र अभिनंदनांचा वर्षाव !

नामवंत सहज सुचलच्या मेघा धाेटे, मायाताई काेसरें सह केले अनेकांनी विशालचे अभिनंदन !

🟣🟩🟡किरण घाटे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी🛑🟩🌀चंद्रपूर जिल्ह्यातील श्री, शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वयंसेवक विशाल मनोहर शेंडे यांना २०१९-२० वर्षातील गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे 🟩🟪🌼🟡 हा पुरस्कार कुलगुरू प्रा.श्रीनिवास वरखेडी, प्र- कुलगुरू श्रीराम कावळे, कुलसचिव चिताडे, रासेयो संचालक डॉ. नरेश मडावी, मुकुंदजी कानेटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले आहे .🌀🛑🟡🟩 यावेळी श्री, शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की उपस्थित होते.
🟧🟩🟣🛑विशाल शेंडे यांनी बी.ए. ला महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना च्या विविध उपक्रमांतून प्रेरणा घेत, राष्ट्रीय सेवा योजना मार्फत महाविद्यालयात होत असलेल्या विविध कार्यक्रमात आपला सहभाग नाेंदवित असे. सोबतच त्याच्या स्वगावी विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम ताे स्वयंस्फुर्तीने राबवित आहे. एव्हढेच नाहीतर
विशाल शेंडेने राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातून राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर सुद्धा विविध शिबिरात सहभाग घेतला आहे.💠🔷🟣🌀 राष्ट्रीय एकता शिबिर गुवाहाटी येथे महाराष्ट्र राज्य संघामध्ये त्यांचा सहभाग होता हे येथे उल्लेखनिय आहे 🟪🟣
वरूर रोड या ग्रामीण भागात गत दोन ते तीन वर्षांपासून सामाजिक, शैक्षणीक, सांस्कृतिक असे नानाविध उपक्रम ताे राबवित आहे.🌀🟣🟧🟪🟩 विशालने युवा मित्रांच्या मदतीने गावामध्ये जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती केली. या साेबतच गावातून दहा हजाराचा निधी गोळा करून वाचनालयासाठी पुस्तके खरेदी केली. 🟩💠🟪🌀🟡विशालने गावात मतदान जनजागृती , थोर महापुरुषांच्या जयंत्या तथा पुण्यतिथी निमित्त अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे .छाेट्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन, वृक्षारोपण, तंबाखू व्यसन मुक्तीसासाठी जनजागृती पर कार्यक्रम स्वच्छता अभियान , एँड्स जनजागृती, रॅली, तसेच लॉक डाऊन च्या काळात, कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अनेक प्रयत्न केले असल्याचे सर्वश्रूतच आहे . 🟪🌼🔷🟣🟡💠गावामध्ये फवारणी व गरजूंना मास्क वितरण , सोशल मीडिया वर जनजागृती इत्यादी कार्य केलेले आहे याबाबत विशालला ग्रामपंचायत कार्यालय वरुर रोड यांच्या कडून प्रमाणपत्र बहाल करण्यांत आले आहे.या शिवाय लॉक डाऊन काळात विशाल ने मुखमंत्री सहायता निधी साठी स्वतःच्या मजुरीतुन एक हजार रुपये व मित्रांकडून मिळालेले 800 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले आहे🟣🛑🟧🌀💠 विशाल शेंडे यांनी आज पावेताे अनेक स्पर्धा जिंकल्या आहे.गुवाहाटी (आसाम) येथे झालेल्या निबंध स्पर्धेत भाग घेऊन, पंधरा राज्यातील विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक घेऊन गोंडवाना विद्यापीठ, महाविद्यालयाचे नावलौकिक केले आहे.
🟣🔷🟧🌀🟪🟩🟡☀️या संपूर्ण राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विविध जागरूकता कार्यक्रम राबविताना गोंडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. नरेश मडावी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.गुरुदास बलकी, डॉ. सारिका साबळे याचे मार्गदर्शन लाभले.
☀️💠🟪🟣🌀विशालच्या या यशाबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य, रासेयो कार्यक्रम अधिकारी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तदवतचं महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलच्या संयाेजिका वैदर्भिय जेष्ठ लेखिका तथा शिक्षिका अधिवक्ता मेघा धाेटे , मायाताई काेसरे , प्रभा अगडे , रसिका रामक्रूष्ण ढाेणे , सुविधा बांबाेडे , ज्याेति मेहरकुरे , प्रतिभा चट्टे , कविता चाफले , श्रध्दा हिवरे , सरीका काेटनाके, अश्विनी डंभारे , प्रतिमा नंदेश्वर , पूनम रामटेके , पूनम जांभूळे आदिंनी अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here